ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 25, 2019 05:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शॉपिंगसाठी आरबीआयने आणला ‘पीपीआय’चा नवा पर्याय

शहर : देश

        डिजिटल पेमेंटसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आता आणखी एक नवा पर्याय आणला आहे. त्यानुसार, प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) ही नवी डिजिटल पेमेंट सिस्टिम लॉन्च करण्यात आली. याद्वारे ग्राहकांना खरेदी करणे सोपे होणार आहे.


       भारतात सध्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये युपीआय, नेटबँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, एआयपीएस, मोबाईल वॉलेट, मोबाईल बँकिंग आणि पीओएस मशीन आदींचा समावेश आहे. त्यानंतर आता आरबीआयने प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) हा नवा पर्याय आणला आहे. 


          पीपीआयचे विस्तारीत रुप प्रिपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट असे आहे. हे एक प्रिपेड अकाऊंट असणार आहे. हे अकाऊंट दर महिन्याला तुम्ही रिचार्ज करु शकता. यासाठी १० हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एकदा हे अकाऊंट रिचार्ज झाले की त्याचा वापर तुम्ही रोजच्या गरजेच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करु शकता. या अकाऊंटचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला फंड ट्रान्सफरची सुविधा मिळणार नाही. यातील पैसे केवळ वस्तू आणि सेवा खरेदीसाठीच वापरता येणार आहेत. हे पेमेंट इन्स्ट्रुमेंट बँकेकडून किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या नॉन बँकिंग पीपीआय प्लेअर्सकडून तयार करुन मिळू शकते.


          या कंपन्या ग्राहकांची माहिती व्हेरिफाय करुन त्यांना पीपीआय अकाऊंट सुरु करुन देऊ शकतात. यासाठी मोबाईल क्रमांक आणि ओटीपी, त्याचबरोबर केवायसीसाठी लागणारे कोणतेही एक ओळखपत्र आवश्यक असणार आहे. या पीपीआयमध्ये केवळ नोंदणीकृत मोबाईल क्रमांक जोडलेल्या बँक अकाऊंटमार्फतच रक्कम जमा करता येणार आहे. 


       हे अकाऊंट रिचार्ज करण्यासाठी आरबीआयने वर्षाला १ लाख २० हजार रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. म्हणजेच महिन्याला केवळ १०,००० रुपयांपर्यंतच रक्कम ग्राहकाला या अकाऊंटमध्ये ठेवता येणार आहेत. आरबीआयने आपल्या नोटिफिकेशनमध्ये याची माहिती दिली आहे.
 

मागे

...म्हणून महिला करतात गर्भाशय शस्त्रक्रिया
...म्हणून महिला करतात गर्भाशय शस्त्रक्रिया

         महाविकासआघाडी सरकारमधील मंत्री व काँग्रेस नेते आमदार नितीन र....

अधिक वाचा

पुढे  

ग्रहणकाळात साईबाबा मंदिर बंद राहणार
ग्रहणकाळात साईबाबा मंदिर बंद राहणार

          अहमनगर - गुरुवारी सूर्यग्रहण असल्याने सकाळी ८ ते ११ या वेळेत ....

Read more