ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 31, 2021 10:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30

RBI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द

शहर : कोल्हापूर

इचलकरंजी येथील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीय. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केलीय. यापूर्वीसुद्धा रिझर्व्ह बँकेनं शिवम बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. काही दिवसांपूर्वीच बँकेतील 24 कोटी 40 लाखांचा अपहारप्रकरणी अध्यक्षांसह 37 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परवाना रद्द झाल्याने जिल्ह्यातील आणखी एका सहकारी बँकेचे अस्तित्व संपुष्टात आलेय.

शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नाही. तसेच भविष्यात भांडवल उत्पन्न करण्याचं कोणतंही साधन नाही. त्यामुळेच बँकेचा परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे. 29 जानेवारी 2021पासून आर्थिक व्यवहार किंवा कोणतेही बँकिंग व्यवहार बँकेला करता येणार नाहीत. आरबीआयनं शिवम सहकारी बँकेचे नुकसानाचे आकडेसुद्धा दिले आहेत.

पैसे जमा करणाऱ्या 99 टक्क्यांहून अधिक खातेदारांची रक्कम इश्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडे आहे. बँक बंद झाली असली तरी लिक्विडेशननंतर बँकेत पैसे जमा असलेल्या खातेदारांना डिपॉझिट इन्श्युरन्स क्लेम मिळणार आहे. ज्यांनी बँकेत 5 लाख रुपये जमा केलेले आहेत, त्यांचा याचा लाभ मिळणार आहे.

बँकेची आर्थिक स्थिती बिकट

आरबीआयनं महाराष्ट्रीतल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीला निर्देश दिले आहेत की, बँकेला बँद करण्याचे निर्देश जारी करावेत. बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. शिवम सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यानं बँक चालून ठेवणं म्हणजे पैसे जमा करणाऱ्या खातेदारांवर अन्याय होईल.

लिक्विडेशननंतर परत मिळणार खातेदारांचे पैसे

सध्या बँक आपल्या खातेदारांना त्यांची सर्व रक्कम परत करण्यास असमर्थ आहे. बँकेला व्यवसाय करण्याची परवानगी दिल्यास लोकांना आणखी नुकसान सहन करावं लागू शकतं. शिवम सहकारी बँकेचं लिक्विडेशन सुरू झाल्यानंतर खातेदारांचे पैसे परत केले जाणार आहेत.     

मागे

Mumbai Local | लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासला शिल्लक दिवसांची मुदतवाढ, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
Mumbai Local | लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासला शिल्लक दिवसांची मुदतवाढ, रेल्वे प्रशासनाचा निर्णय

सोमवारपासून म्हणजेच, उद्यापासून मुंबई लोकल (Mumbai Local) ची दारं सर्वसामान्य प्रव....

अधिक वाचा

पुढे  

नवी मुंबईत बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण
नवी मुंबईत बर्ड फ्लूचा शिरकाव, कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण

महानगरपालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून ६ ठिकाणी कोंबड्यांना ....

Read more