ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पाकाड्यांवर नजर ठेवण्यासाठी RISAT-2BR1 अवकाशात प्रक्षेपण...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 02:52 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाकाड्यांवर नजर ठेवण्यासाठी RISAT-2BR1 अवकाशात प्रक्षेपण...

शहर : देश

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन अर्थ इमेजिंग सॅटलाइट रिसॅट-२ बीआर १ चे प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही हा भारताचा अत्यंत भरवशाचा अवकाशयान प्रक्षेपक आहे. पीएसएलव्हीची ही ५० वी मोहिम होती.

RISAT-2BR1 हा रडार इमेजिंग अर्थ ऑब्जर्व्हेशन सॅटेलाइट आहे. या उपग्रहाचे वजन ६२८ किलो आहे. RISAT-2B मालिकेतील हा दुसरा उपग्रह आहे. RISAT-2 ची जागा घेण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या RISAT-2B उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते. रिसॅट उपग्रहांची मालिका असून प्रामुख्याने हेरगिरीसाठी या उपग्रहांचा उपयोग करण्यात येणार आहे.

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपग्रह खूप महत्वाचा आहे. या उपग्रहाला स्पाय सॅटलाइट म्हटले जाते. हा एक बहुउपयोगी उपग्रह असून त्याचे वेगवेगळे फायदे आहेत. रिसॅट-२ बीआर१ उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित झाल्यानंतर भारताची रडार इमेजिंग म्हणजे शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.  या उपग्रहाचे काम सुरु झाल्यानंतर लगेचच आपल्याला आवश्यक फोटो मिळण्यास सुरुवात होईल.

या उपग्रहामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होईल. सैन्यदलांना रणनिती ठरवण्यात या उपग्रहाची मदत होईल. शत्रुच्या हालचाली या उपग्रहाच्या नजरेतून सुटण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.  कुठल्याही वातावरणात ढगांच्या आडूनही फोटो काढण्यास RISAT-2BR1 सक्षम आहे. त्याशिवाय शेती, जंगल आणि आपत्तीच्या काळातही या उपग्रहाची मदत मिळणार आहे.  

मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर भारताने रिसॅट २ उपग्रह प्रक्षेपित केला होता. पाकिस्तानातून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी, सीमेपलीकडे दहशतवाद्यांचे तळ याची खडानखडा माहिती मिळू शकेल. बालाकोट सारख्या मिशनची आखणी करण्यामध्ये भविष्यात रिसॅट-२बीआर१ खूप महत्वाचा ठरेल.
 

मागे

...आणि काँग्रेसचा तीव्र विरोध, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत गदारोळ
...आणि काँग्रेसचा तीव्र विरोध, नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयक २०१९ लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता त....

अधिक वाचा

पुढे  

जिल्हा परिषदेच्या 47 कोटींच्या कामांना सर्रास ब्रेक...
जिल्हा परिषदेच्या 47 कोटींच्या कामांना सर्रास ब्रेक...

ग्रामीण स्थरावर पाण्यासाठी सुरू असलेली भटकंती कायमची रोखण्यासाठी पंत....

Read more