By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 06, 2019 02:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पालघर
पालघर स्थानकात एका वृद्ध व्यक्तिला अत्यव्स्थ वाटत असल्याने त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी रेल्वे व्यवस्थापनाकडे मदतीसाठी धावा केला. मात्र डॉक्टर उपलब्ध असतानाही अपेक्षित मदत मिळत नसल्याचे पाहून थेट फलाटावर रिक्षा नेण्यात आली आणि आजारी व्यक्तिला दवाखान्यात नेण्यात आली. ह्या मदतीच्या बदल्यात रेल्वे सुरक्षा दलाने रिक्षावाल्यावर खटला दाखल करून कोर्टाच्या फेर्या मारायला लावले आहे.
अधिक माहिती अशी की, एक वृद्ध गृहस्थ गणपती सण आटोपून आपल्या कुटुंबासोबत मुंबईकडे जात होते. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने कुटुंबियांनी रेल्वेकडे मदतीसाठी धाव घेतली मात्र रेल्वेकडे दोन वेळा जाऊन ही उचित प्रतिसाद न मिळाल्याने व डॉक्टर असूनही मदत न मिळाल्याने शेवटी चिकू फळ विक्रेत्याच्या मदतीने रिक्षावाल्याला बोलवण्यात आले व वृद्ध गृहस्थाना दवाखान्यात नेण्यात आले.
मात्र हे होऊनही रिक्षावाल्याला फलाटावर रिक्षा घेऊन आल्यामुळे नियमभंग केल्याबद्दल गुन्हा नोंद केला केला गेला व 11 सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यामुळे मदतीसाठी आल्यावरही गुन्हा नोंद केल्यामुळे नागरिकांच्या मनात रेल्वे सुरक्षा दलाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
शनिवारी रात्री 1.30 ते 2,30 च्या दरम्यान चंद्रयान 2 चंद्राच्याभूमीवर उतरेल.त्याच....
अधिक वाचा