ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

एसबीआयच्या ग्राहकांना पैसे काढताना द्यावा लागणार ओटीपी 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 02:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसबीआयच्या ग्राहकांना पैसे काढताना द्यावा लागणार ओटीपी 

शहर : देश

        मुंबई - नवीन वर्षांची ग्राहकांसाठी एसबीआयने (SBI) एक चांगली बातमी दिली आहे. आता देशात स्टेट बँकेच्या सर्व एटीएममधून एक जानेवारीपासून डेबिट कार्डच्या वापराशिवाय रक्कम काढता येणार आहे. स्टेट बँकेच्या कोणत्याही एटीएमवर रात्री ८ ते सकाळी ८ या कालावधीत ही सुविधा मिळेल. मात्र या अंतर्गत १० हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम काढता येणार नाही.

 

       दरम्यान, स्टेट बँकेव्यतिरिक्त अन्य बँकेच्या डेबिट कार्डच्या साह्याने ओटीपीचा वापर करून पैसे काढता येणार नाहीत, असे स्टेट बँकेने स्पष्ट केले आहे. कार्ड स्किमिंग, कार्ड क्लोनिंग आदी धोक्यांना आळा बसेल असे बँक प्रशासनाला वाटत आहे. 

 

        नवीन वर्षात ATM मधून पैसे काढताना OTPच्या माध्यमातून पैसे काढता येतील, अशी माहिती स्टेट बँकेने ट्विट करुन दिली आहे. यासाठी संबंधित कार्डधारकाच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) पाठवला जाईल आणि त्याआधारे पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

 

        एटीएममध्ये (ATM) कॅश विथड्रॉवलचा पर्याय नोंदवल्यानंतर संबंधित कार्डधारकास त्याच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक मेसेज येईल. या मेसेजद्वारे ओटीपी मोबाईलवर प्राप्त होईल. यानंतर ग्राहकाने एटीएमवर इच्छित रक्कम टाइप केल्यानंतर ATM मशीनच्या पडद्यावर ओटीपीबाबत विचारणा होईल. मेसेजमध्ये आलेला ओटीपी एटीएममध्ये नोंदवल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल. त्यानंतर ग्राहकास रक्कम मिळेल. त्यामुळे डेबिट कार्डची गरज यापुढे लागणार नाही.

मागे

ट्रक दरीत कोसळून क्लिनर जागीच ठार 
ट्रक दरीत कोसळून क्लिनर जागीच ठार 

     कोल्हापूर येथून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहक ट्रक (एमएच-09/सीयू-46....

अधिक वाचा

पुढे  

महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार
महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार

      अहमदनगर - नगर-सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि क....

Read more