ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

डेबिट कार्डावरून खरेदी करणाऱ्यांसाठी एसबीआयकडून खास सुविधा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 09, 2019 12:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

डेबिट कार्डावरून खरेदी करणाऱ्यांसाठी एसबीआयकडून खास सुविधा

शहर : मुंबई

देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली आहेया सुविधेचा ग्राहक फायदा घेऊ शकतात. नवीन सुविधेअंतर्गत एसबीआय खातेधारकांना डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यानंतर आता EMI ची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांना POS मशीनमधून स्वाइप करावं लागेल. म्हणजे, ज्यावेळी खरेदीनंतर कार्ड स्वाइप करता, त्यावेळी तुमचं बिल EMI मध्ये कन्वर्ट करण्याची सुविधा मिळेलSBI ग्राहकांना POS मशीनवर स्वाइप केल्यानंतरच ही सुविधा मिळणार आहे.एसबीआयने केलेल्या ट्विटनुसार, POS मशीनचा वापर ४० हजारहून अधिक व्यापारी करत आहेत.

कोणताही चार्ज नाही

एसबीआयकडून ट्विट करुन सांगण्यात आले की, खरेदीचं बिल EMI मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही. या सुविधेसाठी  बँक कोणतीही प्रोसेसिंग फी घेणार नाही आणि कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी होणार नाही.

EMI किती दिवस?

शॉपिंग बिल EMIमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ग्राहकाला ते १८ महिन्यात त्यांचं पेमेन्ट करावं लागेल. बँकेकडून फ्रीज आणि टीव्ही खरेदी करण्यासाठीही लोन दिले जाणार आहे.

ग्रेस पीरियज्यावेळी ग्राहक खरेदी बिल EMI मध्ये कन्वर्ट करेल, त्यानंतर त्याला पुढील महिन्यापासून EMI वर रक्कम भरण्यास सुरुवात करावी लागेल. बँकेकडून SMS आणि Email द्वारे याची माहिती देण्यात येईल.बँक अशाच ग्राहकांना लोन देणार आहेज्यांचा लोन ट्रॅक चांगला आहे. तुम्हाला लोन मिळेल की नाही, हे तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोरवरुन चेक करु शकता.

 

मागे

दसऱ्याच्या शुभदिनी सोन्या, चांदीचे दर जाणून घ्या
दसऱ्याच्या शुभदिनी सोन्या, चांदीचे दर जाणून घ्या

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असा दसरा सण सर्वत्र साजरा केला जातो. याचं दिना....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यातील या सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन आर्थिक निर्बंध घातले
पुण्यातील या सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करुन आर्थिक निर्बंध घातले

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. आर्थिक ....

Read more