ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन 

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 30, 2020 03:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन 

शहर : पुणे

          पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या विद्या बाळ यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षाच्या होत्या. आज सायंकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाने महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची  भावना व्यक्त होत आहे. 

         महिलांवर समाजात होणार्‍या अत्याचार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे कार्य विद्या बाळ यांनी मोठ्या प्रमाणात केले होते. तसेच रूढी, परंपरा यांच्यावर कडाडून प्रहार करीत त्यांनी स्त्रियांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिला. त्यांनी 'स्त्री' मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी 'नारी समता मंच'ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरुष यांच्यातील नव्या संबंधाची नवी मांडणी करणारे "मिळून सार्‍याजणी" हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याच बरोबर 'सखी' मंडळाचीही स्थापना केली. तब्बल ३० वर्षे त्यांनी या मासिकाचे संपादकपद भूषविले.  
 

मागे

जगात सर्वाधिक ट्राफिक असलेल्या शहरांमध्ये
जगात सर्वाधिक ट्राफिक असलेल्या शहरांमध्ये "बेंगळुर" प्रथम स्थानी

         नवी दिल्ली : भारतातील रस्त्यांवर सर्वाधिक वाहनांची ट्राफिक अस....

अधिक वाचा

पुढे  

भारतात कोरोना व्हायरसची बाधा: केरळमध्ये सापडला रुग्ण
भारतात कोरोना व्हायरसची बाधा: केरळमध्ये सापडला रुग्ण

        नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांना उपचारासाठी नवीन रु....

Read more