ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 12:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टेम्पो नदीत कोसळून सात ठार तर पाच गंभीर

शहर : धुळे

ऊसतोडीसाठी उस्मानाबाद येथे जात असलेल्या मजुरांनी भरलेला पिकअप टेम्पो पुलावरून नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी असून, अन्य सात किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांत महिला आणि लहान मुलांचा समावेश प्रामुख्याने आहे. अपघाताचे दृश्य इतके भयाण होते की अनेकांच्या अश्रू अनावर झाले होते. धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलावर मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात झाला.

धुळे सोलापूर महामार्गावरील हे दुर्घटना असून बोरी नदीच्या पुलावरून हा अपघात झाला आहे. या अपघातातील मयत हे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील मजूर आहेत. अरुंद पुलाचा अंदाज चालकाला आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुलावरून टेम्पो थेट नदीपात्रात कोसळला.

अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांनी वीसएक जणांना पाण्यातून बाहेर काढले. जखमींना  स्थानिकांनी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. वाहनाच्या चालकाला पुल अरुंद असल्याचा अंदाज आल्याने त्याचा ताबा सुटून हा अपघात झाला.

 

मागे

देशाचा आर्थिक विकास दर गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या स्तरावर
देशाचा आर्थिक विकास दर गेल्या सहा वर्षांतील सर्वात खालच्या स्तरावर

देशाचा विकासदर दिवसेंदिवस घसरत चाललेला दिसतोय. सप्टेंबर महिन्यात देशाचा आ....

अधिक वाचा

पुढे  

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ स्पेशल ट्रेन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या १२ स्पेशल ट्रेन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या आं....

Read more