ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिरोळमध्ये अद्याप 15 हजार लोक अडकलेलेच

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शिरोळमध्ये अद्याप 15 हजार लोक अडकलेलेच

शहर : कोल्हापूर

पाऊस थांबल्याने महापूराने वेढलेल्या कोल्हापूर आणि आलमंट्टीतून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने सांगली जिल्ह्यातील पाणी आता ओसरू लागले आहे. पंचगंगेची पाणी पातळी 50 फुटांवर आली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील 41 गावांमध्ये अद्यापही सुमारे 15 हजार लोक अडकलेले आहेत. त्याचबरोबर पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 30000पेक्षा जास्त वाहने अडकून पडलेली आहेत. तथापि याच महामार्गावर बंगळुरुच्या दिशेने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आलेली आहेत. शिरोली फाट्याजवळ पाणी ओसरल्याने अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे

त्यामुळे हजारो ट्रक बेंगळुरूकडे रवाना झाले आहेत. पण कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक अजून ठप्प आहे.

पूरग्रस्त भागातून एकूण 4 लाख 41 हजार 845 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात 1 लाख 58 हजार कोल्हापूरमधील 2 लाख 45 हजार 229, सातारामधील 10486 , सोलापूर 26999 नागरिकांचा समावेश आहे.

मागे

दीपाली सय्यद का बसले आमरण उपोषणाला ?   
दीपाली सय्यद का बसले आमरण उपोषणाला ?  

महाराष्ट्रात एकीकडे महापूर आहे म्हणून माणसं चिंताग्रस्त आहेत. तर दुसरीकडे ....

अधिक वाचा

पुढे  

अजित पवार यांच्या फार्म हाऊस ला आग
अजित पवार यांच्या फार्म हाऊस ला आग

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यात घोटावडे ये....

Read more