ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कंगनाच्या उद्गारांशी असहमत, खासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य नाही - उच्च न्यायालय

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2020 10:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कंगनाच्या उद्गारांशी असहमत, खासदाराने अशी प्रतिक्रिया देणे योग्य नाही - उच्च न्यायालय

शहर : मुंबई

कंगनाच्या उद्गारांशी आम्ही असहमत आहोत, पण एका खासदाराने अशी प्रतिक्रिया द्यावी हे शोभते का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला. कंगना रानौतने केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान राऊत यांच्या वकिलांनी त्यांची बाजू काल मांडली.

आम्हीही महाराष्ट्रीय आहोत, आम्हालाही राज्याचा अभिमान आहे पण आम्ही कोणाचं घर तोडायला जात नाही, असे न्यायालयाने राऊत यांना सुनावले. अशी प्रतिक्रिया योग्य आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. कायदा काय आहे, उखाड देंगे म्हणजे काय, असा सवाल न्यायालयाने केला. तुम्ही खासदार आहात. तुम्ही कायद्याचा सन्मान राखू शकत नाही का? तुम्ही विचारता कायदा काय आहे, अशा शब्दात न्यायालयाने राऊत यांना खडसावले.

दरम्यान, कंगनाविरुद्ध घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या हिताची भूमिका होती, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचे दात घशात जातील, असंही राऊत म्हणाले. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट सामनाच्या मुलाखतीसाठीच होती, असे सांगतानाच लवकरच आपण काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप नेते अमित शाह यांचीही मुलाखत घेणार आहोत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

 

 

 

पुढे  

आजपासून बदलले डेबिड, क्रेडीट कार्डचे नियम, व्यवहार करण्यापूर्वी हे वाचा
आजपासून बदलले डेबिड, क्रेडीट कार्डचे नियम, व्यवहार करण्यापूर्वी हे वाचा

जर तुम्ही आयसीआयसीआय किंवा एसबीआयचे ग्राहक असाल तर एव्हाना तुम्हाला एक मेस....

Read more