ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Corona | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकरांची 91 व्या वर्षी कोरोनावर मात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 08:26 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Corona | माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकरांची 91 व्या वर्षी कोरोनावर मात

शहर : लातूर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या 91 व्या वर्षी कोरोनावर मात केली आहे. शिवाजीराव पाटील-निलंगेकर नुकतंच कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांना 16 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना काही लक्षणं जाणवत होती. त्यावेळी त्यांनी तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर 17 दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वा: सोडला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक मंत्री, आमदार, खासदार यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विद्यमान मंत्र्यांनी कोरोनावर मात केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अशोक चव्हाण यांना 25 मे रोजी कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेडवरुन मुंबईला हलवलं होतं. त्यानंतर उपचाराअंती अशोक चव्हाण यांना 4 जूनला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

 

पुढे  

सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन
सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल....

Read more