ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पोलीस अधिकाऱ्याने लाठ्या घ्या रे म्हणताच; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2019 06:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पोलीस अधिकाऱ्याने लाठ्या घ्या रे म्हणताच; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय

शहर : नाशिक

नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसाने गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे महापुराची परिस्थिती निर्माण होऊन औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील १७ गावांचा संपर्क तुटू शकतो. प्रशासनातर्फे सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. सोमवारी स्थानिक शिवसैनिकांनी पुराच्या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी अरेरावा भाषा करत असल्याने, एका अधिकाऱ्यांने लाठ्या घ्या रे हातात म्हणताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.

आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी ओसंडून वाहत होती. त्यामुळे सर्व धरणांतील पाणी हे गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावरील गावे खाली करण्यात आली आहे. मात्र स्थानिकांच्या गर्दीने मदतकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास वैजापूर येथील शिवसेनच्या काही पदाधिकाऱ्यांनी पूर आलेल्या वांजरगाव येथे भेट दिली. यावेळी प्रशासन काहीच करत नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. सेनेच्या नेत्यांची अरेरावी वाढतच चालल्याने वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी, लाठ्या घ्या रे हातात असे आदेश कर्मचाऱ्याना देताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

एवढच नाही तर पोलिसांनी या नेत्यांना अक्षरशा हाकलून लावले. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. ज्यात शिवसेनेचे नेते संजय पाटिल पोलिसांशी वाद घालत आहे. मात्र पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनच्या या नेत्यांनी मात्र काढता पाय घेतला. परिसरात या घटनेची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.

 

 

मागे

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही कलम 370 ला विरोध होता.
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही कलम 370 ला विरोध होता.

जम्मू-काश्मीरला स्वायत्त राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हे गेली 70-72 वर्षं देशाच....

अधिक वाचा

पुढे  

सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काय बदलणार?
सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये काय बदलणार?

जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाबाबत मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यस....

Read more