ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 08:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन

शहर : ठाणे

शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांचं निधन झालं. उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

सुनील सुर्वे हे उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेच्या तिकीटावर नगरसेवकपदी निवडून आले होते. सुनील सुर्वे यांनी 25 दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली होती.

श्वास घेण्यास पुन्हा त्रास जाणवल्याने सुर्वे यांना उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुनील सुर्वे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

उल्हासनगरच्या मराठा पट्ट्यातील खंदे शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सुनील सुर्वे गेली अनेक वर्ष सर्वसामन्यांच्या प्रश्नांसाठी झटत होते. उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील रस्त्याचे रुंदीकरण होण्यामागे त्यांचा मोठा वाटा आहे.

सुनील सुर्वे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपदही भूषवले आहे. सुर्वे यांनी 2017 मध्ये उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या सुर्वेंनी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर पाण्याची बाटली फेकून मारल्याने ते चर्चेत आले होते.दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे माहिती दिली. आपल्या संपर्कातील व्यक्तींना कोव्हिड चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

 

मागे

पुणे पालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पुणे पालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू

पुणे महापालिकेत आतापर्यंत 374 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्....

अधिक वाचा

पुढे  

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा कोरोना पॉझिटिव्ह

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आ....

Read more