ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2021 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दगडाने ठेचून तरूणाची निर्घुण हत्या

शहर : नागपूर

नागपूर शहरात हत्यासत्र सुरुच आहे. शुक्रवारी शहरातील लष्करीबाग परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. कपिन बेन( 18) असं मयत तरुणाचं नाव आहे. याप्रकरणातील तिन्ही आरोपी पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

नागपुरातील लष्करीबाग परिसरात शीतला माता मंदिराच्या मागील गल्लीत ही घटना घडली. कपिल बेन या परिसरात उभा असताना उमेश चिकाटे,कालू आणि भुरू यांच्याशी खर्रा खाताना त्याचा वाद झाला.  त्यांच्या वाद विकोला गेला. आणि उमेश,कालू आणि भूरू यांनी वादातून कपिलची माराहण करत खाली पाडले. आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली..त्यानंतर तिन्ही आरोपी तिथून पसार झालेत.

या हत्येच्या घटनेनंतर  लष्करीबाग परिसरात एकच खळबळ उडाली. पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं हत्यासत्रामुळं नागरिकांत दहशत आणि संताप आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं कठोर पाऊलं उचलण्याची मागणी होत आहे. आरोपींच्या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली असुन त्यांना अटक करण्यासाठी पाचपावली पोलीस ठाण्याचे डीबी पथक रवाना करण्यात आले आहे. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. कपीलच्या परिचितांनी घटनास्थळी येऊन संताप व्यक्त करणे सुरू केले.

 

मागे

मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गांवर किमान इतके असणार प्रवासी भाडे
मुंबई मेट्रोच्या नवीन मार्गांवर किमान इतके असणार प्रवासी भाडे

मुंबईकरांसाठी (Mumbaikar) एक चांगली आहे. मुंबई मेट्रोच्या (Mumbai Metro) मार्गात आणखी दोन र....

अधिक वाचा

पुढे  

CORONA VIRUS : देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
CORONA VIRUS : देशात 1 लाख 73 हजार 790 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासू....

Read more