ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हेमंत नगराळे पूर्णवेळ डीजीपी कधी होणार? 26/11 च्या मुंबई हल्ल्यावेळी काय करत होते?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 08, 2021 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

हेमंत नगराळे पूर्णवेळ डीजीपी कधी होणार? 26/11 च्या मुंबई हल्ल्यावेळी काय करत होते?

शहर : मुंबई

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार काल आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांनी स्वीकारला. पुढच्या काही दिवसात तेच फूल टाईम डीजीपी असतील याचीही जोरदार चर्चा आहे. सध्या मंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे सरकारनं त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. पण नगराळे पूर्ण वेळ पोलीस महासंचालक झाले तर त्यांना सर्वोच्च पदावर दीड वर्षाचा कार्यकाळ मिळेल.

26/11 च्या मुंबई हल्ल्या वेळी काय करत होते नगराळे?

ज्यादिवशी मुंबई अतिरेक्यांनी हल्ला केला त्यावेळेस हेमंत नगराळे हे दक्षिण मुंबईतल्या कुलाबा भागात त्यांच्या घरी होते. तिथून अतिरेक्यांनी टार्गेट केलेला लिओपोल्ड कॅफे काही मिनिटाच्या अंतरावर होता. फायरिंगचा आवाज सुरु झाला त्यावेळेस हेमंत नगराळे घरी डिनर करत होते. अंगात त्यांच्या टी शर्ट होतं. फायरिंगचा आवाज जसाही ऐकायला मिळाला तसे नगराळेंनी जेवण सोडलं आणि सर्व्हिस रिव्हॉलव्हर घेऊन ते कॅफेकडे गेले. ते पोहोचपर्यंत अतिरेकी लिओपोल्ड कॅफेतून निघून ताज हॉटेलमध्ये घुसले होते. नंतर नगराळेही ताजकडं गेले. हॉटेलमधून बाहेर पडणाऱ्यांना त्यांनी मदत केली. तसच मुंबई पोलीस आणि केंद्रीय संस्थांमध्ये त्यादिवशी त्यांनी समन्वय साधण्याचं कामही केलं. ताज हॉटेल्या बाहेर आरडीएक्सची बॅग होती, ती डिफ्यूज करण्यातही नगराळेंनी महत्वाची भूमिका वठवल्याची माहिती आहे.

गडचिरोली-नक्षलभागात दिर्घकाळ सेवा

हेमंत नगराळेंनी नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यातही दिर्घकाळ सेवा केलेली आहे. त्यामुळे संवेदनशिल भागात काम करण्याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्याचाच फायदा त्यांना मुंबई हल्ल्याच्या वेळी झाला. मुंबईवरचा हल्ला हा अंडरवर्ल्डचं शुटआऊट नसून मोठा अतिरेकी हल्ला असल्याची जाणीव त्यांना अनुभवातूनच झाली.

SIT मध्येही नगराळेंचं काम

महाराष्ट्रात गाजलेल्या तेलगी कांडाची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी बनवलेली होती. त्यात प्रतिनियुक्तीवर गेलेले डीजीपी सुबोध जयस्वाल तर होतेच पण हेमंत नगराळेही होते. स्टाफ ऑफिसरची त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. विशेष म्हणजे त्या एसआयटीनं कॉन्सटेबलपासून ते डीजीपीपर्यंत अनेकांना अटक केलेली होती. नगराळेंनी सीबीआयमध्येही बऱ्याच काळ काम केलेलं आहे.

मागे

जगण्याच्या अधिकारापेक्षा धर्माचा अधिकार मोठा नाही: मद्रास उच्च न्यायालय
जगण्याच्या अधिकारापेक्षा धर्माचा अधिकार मोठा नाही: मद्रास उच्च न्यायालय

धार्मिक अधिकार कधीही जीवनाच्या अधिकारापेक्षा मोठा असू शकत नाही. जगण्याचा अ....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय लष्करात महिलांसाठी मोठी संधी, पुण्यात 12 ते 14 जानेवारी दरम्यान भरती, फक्त 10 वी पासची अट
भारतीय लष्करात महिलांसाठी मोठी संधी, पुण्यात 12 ते 14 जानेवारी दरम्यान भरती, फक्त 10 वी पासची अट

पुण्यात महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 12 ते 14 जानेवारीदर....

Read more