ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

SSC Results : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30%, यंदाही मुलींची बाजी, बोर्डाची पत्रकार परिष

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 06:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

SSC Results : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30%, यंदाही मुलींची बाजी, बोर्डाची पत्रकार परिष

शहर : मुंबई

दहावी एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. विभागांमध्ये  कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त म्हणजे 98.77 टक्के, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 92 टक्के इतका लागला.

पुणे विभागाचा निकाल 97.34 टक्के लागला, तर मुंबई विभागातून 96.72 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सालाबादप्रमाणे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली. दहावीच्या परीक्षेत 96.91 टक्के मुली, तर 93.90 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर दहावीचा निकाल पाहता येईल.

विभागनिहाय टक्केवारी

कोकण – 98.77 टक्के

पुणे – 97.34 टक्के

कोल्हापूर – 97.64 टक्के

मुंबई – 96.72 टक्के

अमरावती – 95.14 टक्के

नागपूर – 93.84 टक्के

नाशिक – 93.73 टक्के

लातूर – 93.09 टक्के

औरंगाबाद – 92 टक्के

निकालाची वैशिष्ट्ये

परीक्षेला बसलेले विद्यार्थी – 15,84,264

उत्तीर्ण विद्यार्थी – 15,01,105

निकालाची टक्केवारी – 95.30

उत्तीर्ण मुलींची टक्केवारी – 96.91

उत्तीर्ण मुलांची टक्केवारी – 93.90

दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल – 92.73 टक्के उत्तीर्ण

पुनर्परीक्षार्थी निकाल – 75.86 टक्के उत्तीर्ण

60 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल 100 टक्के

प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी – 5,50,809

द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी -3,30,588

उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी – 80,335

8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 18.20 टक्के जास्त निकाल

कोरोनासह अनेक अडचणी मात करुन निकाल जाहीर

कोरोनामुळे भूगोलाचा पेपर रद्द, इतर विषयांच्या सरासरीनुसार भूगोल विषयाचे गुण

राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थीसंख्या 65 हजार 85 ने वाढली आहे

संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी 4 हजार 979 परीक्षा केंद्रे होती

एकूण 22 हजार 586 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यात 3 ते 23 मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा

पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

यामध्ये 9 लाख 75 हजार 894  मुले 7 लाख 89 हजार 894 मुली आहेत.

राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली.

एकूण 9 हजार 45 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

मागे

नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीत तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीत तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीतील तब्बल 44 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह....

अधिक वाचा

पुढे  

SSC Result 2020 | गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत कशी मिळवाल?
SSC Result 2020 | गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत कशी मिळवाल?

अखेर बहुप्रतिक्षित दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. मार्च 2020 मध्....

Read more