ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गुगमाल राष्ट्रीय उद्यानात डोहात बुडून वाघाचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 10, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गुगमाल राष्ट्रीय उद्यानात डोहात बुडून वाघाचा मृत्यू

शहर : अकोला

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत गुगमाल राष्ट्रीय उद्यानात पाण्याच्या डोहात बुडून वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी सकाळीच हा मृत्यू उघडकीस आला असताना मेळघाट प्रशासनाने मात्र ही बाब लपवून ठेवली. मेळघाटातील ढाकना परिसरात जिथून वाघांच्या शिकारीचे सत्र उघडकीस आले होते, तिथून जवळच ही घटना घडली.
गुगमाल राष्ट्रीय उद्यानात नैसर्गिक पाणवठा आहे. या पाणवठ्यात  टी-32 हा अंदाजे सात ते दहा वर्षांचा वाघ पाण्यात बुडून मृत पावल्याचे बुधवारी सकाळी लक्षात आले. वाघाचा मृतदेह फुगून पाण्यावर आला होता. पाणवठ्याच्या दगडांच्या कपारीवर वाघांच्या नखांचे ओरखडे होते. त्यामुळे पाण्याबाहेर पडण्यासाठी त्याने बराच प्रयत्न केला असावा. त्याची नखे झिजून तुटलेली होती. शरीराला दुर्गंध सुटायला लागला होता. हृदय फुगलेले होते आणि यकृत खराब झाले होते. घटनेची माहिती कळताच संबंधित वनाधिकारी व दोन्ही मानद वन्यजीव रक्षक तसेच पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले. अतिशय उंच आणि मोठी शरीरयष्टी असलेल्या वाघाला तब्बल आठ जणांनी मिळून बाहेर काढले. या सर्व प्रक्रियेत सायंकाळ झाल्याने शवविच्छेदन गुरुवारी सकाळी सात वाजता करण्यात आले. 

मागे

परळीत पाणी टंचाईचा पहिला बळी; पाणी भरताना शॉक लागून मृत्यू 
परळीत पाणी टंचाईचा पहिला बळी; पाणी भरताना शॉक लागून मृत्यू 

परळी वैजनाथ येथे पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून, पाणी भरण्याच्या धडपड....

अधिक वाचा

पुढे  

अतिशी विरुद्ध गौतम गंभीर; आप आणि भाजपमध्ये खडाजंगी
अतिशी विरुद्ध गौतम गंभीर; आप आणि भाजपमध्ये खडाजंगी

लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान 12 मे रोजी होत आहे. या टप्यात दिल्लीतील मत....

Read more