ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन सुरु, ठाणे ग्रामीण भागातही दहा दिवस कडक निर्बंध

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 02, 2020 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊन सुरु, ठाणे ग्रामीण भागातही दहा दिवस कडक निर्बंध

शहर : ठाणे

कोरोना’ चा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ठाणे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन सुरु झाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आजपासून पुढील दहा दिवस कडक निर्बंध असतील. आज (2 जुलै) सकाळी 7 वाजता सुरु झालेला लॉकडाऊन रविवार 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत राहील. सर्व हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. (Thane Kalyan Dombivali Lockdown)

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कामानिमित्त घराबाहेर जाता येईल. त्याचप्रमाणे रिक्षा-टॅक्सीसह सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूकही या काळात बंद राहील. व्यावसायिक आस्थापना, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदाम यांच्यासह सह सर्व दुकाने बंद राहतील

आपत्कालीन वैद्यकीय सेवेतील प्रवाशांना वाहतुकीस परवानगी आहे. त्यातही चालकासह केवळ एका व्यक्तीला खाजगी वाहनाने प्रवास करण्याची मुभा आहे. मीरा भाईंदर, नवी मुंबई या भागातही लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे.

दरम्यान, ठाणे जिल्हा क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या-त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील महापालिकांचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद/नगर पंचायत आणि ग्रामीण क्षेत्रातही 2 जुलै रात्री 12 वाजल्यापासून 11 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अतिरिक्त प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लागू केले आहेत.

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत काय सुरु, काय बंद?

1) नाशवंत वस्तूंच्या ने-आण करण्याशिवाय इतर आणि सर्व कारणांकरिता महापालिका हद्दीत लॉकडाऊन लागू असेल.

2) इंटरसिटी, एसटी बसेस किंवा मेट्रोसारख्या कोणत्याही सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही

3) टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. जीवनाश्यक वस्तू, आरोग्य सेवा अंतर्गत येणाऱ्या प्रवासास ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाला खाजगी वाहनांमध्ये परवानगी

4) सर्व आंतरराज्य बस आणि प्रवासी वाहतूक सेवा (खाजगी वाहनांसह) तसेच खाजगी ऑपरेटर यांचे कामकाज बंद असेल. तर ठाण्याबाहेरुन येऊन ठाणे जिल्ह्यामार्गे बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.

5) ज्या व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे, त्यांनी आदेशाचे सक्त पालन केले पाहिजे. अन्यथा ती व्यक्ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.

6) सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर यावे

7) सार्वजनिक ठिकाणी आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध आहे.

8) व्यावसायिक आस्थापना कार्यालय आणि कारखाने, कार्यशाळा, गोदाम इत्यादींसह सर्व दुकानांनी त्यांचे कामकाज बंद ठेवावे.

9) सतत प्रक्रिया आणि फार्मास्युटीकल्स इत्यादी आवश्यक असलेल्या उत्पादन आणि उत्पादक युनिटला परवानगी असेल .

10) डाळ व तांदूळ गिरणी खाद्य आणि संबंधित उद्योग, दुग्धशाळा खाद्य व चारा इत्यादींचा आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांत गुंतलेल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्यास परवानगी असेल.

11) सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची

12) आवश्यक वस्तू आणि सेवा प्रदान करणाऱ्या दुकाने, आस्थापनावरील प्रतिबंध बँक, एटीएम, विमा आणि संबंधित बाबी, आयटी आणि आयपीएस टेलिकॉम, टपाल, इंटरनेट आणि डेटा सेवांना वगळण्यात आले आहे.

दरम्यान, दहा दिवसांच्या कडक लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याची कमतरता भासू नये, यासाठी ठाण्यातील जांभळी नाक्यावर असलेल्या मुख्य बाजारपेठेत काल भाजी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली.

 

मागे

भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खासगी रेल्वे धावणार
भारतीय रेल्वेची खासगीकरणाकडे वाटचाल, 109 मार्गांवर 151 खासगी रेल्वे धावणार

भारतात गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे खासगीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे (Indian ....

अधिक वाचा

पुढे  

प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र, रुग्ण नातेवाईकांसाठी सीसीटीव्ही - राजेश टोपे
प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र, रुग्ण नातेवाईकांसाठी सीसीटीव्ही - राजेश टोपे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्लाझ्मा थेरपी वाढवण्याचे ठरवल....

Read more