ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 18, 2020 02:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी

शहर : मुंबई

      मुंबई -  ५० मिमी जाडीच्या पिशव्यांनाही बंदी घालण्यात आली. मात्र  प्लास्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या अजूनही बंद झालेल्या नाहीत. तथापि महाराष्ट्र नव्याने स्थानापन्न झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने यापुढे मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घातली आहे. मंत्री, सचिव, इतर कार्यालयांमध्ये पिण्याचं पाणी हे एकतर कुलरद्वारे किंवा काचेच्या बाटलीतून मिळणार आहे.


      मंत्रालयात आता प्यायचे पाणी हे काचेच्या बाटलीतून दिले जाणार आहे. मंत्रालयातील प्लास्टिक बॉटल्स आता पूर्णपणे हद्दपार होणार आहेत. मंत्रालयातील कँटिन, अधिकारी आणि मंत्र्यांच्या दालनात देखील आता काचेच्या बाटल्या दिसत आहेत. दरम्यान, २०१८ मध्ये महाराष्ट्रात युतीच्या सरकराने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. पण मंत्रालयात पिण्याच्या पाण्यासाठी २५० एमएलची प्लास्टिक बॉटल्स वापरण्याची परवानगी दिली होती.

मागे

साई जन्मभूमी वादात शिर्डी बंद
साई जन्मभूमी वादात शिर्डी बंद

         शिर्डी : साईबाबा यांच्या जन्मस्थळ असलेल्या पाथरी गावाचा वि....

अधिक वाचा

पुढे  

रिलायन्स इंडस्ट्रीच्या विक्रमी नफ्याची नोंद पाहिली का?
रिलायन्स इंडस्ट्रीच्या विक्रमी नफ्याची नोंद पाहिली का?

     मुंबई - डिसेंबरअखेरच्या तिमाहीमध्ये विक्रमी नफ्याची नोंद मुकेश अंब....

Read more