ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

नळदुर्ग किल्ल्याजवळील नदीत बोट उलटली, तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नळदुर्ग  किल्ल्याजवळील नदीत बोट उलटली, तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

शहर : उस्मानाबाद

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये सकाळी पावणेदहाच्या सुमारास 7 ते 8 मुले नदीत बुडाल्याची दुर्घटना घडली. येथील बोरी नदीमध्ये फरुख नय्यरआझम काझी यांचे कुटुंब बोटीमध्ये पर्यटनाचा आनंद लुटत असताना अचानक बोट पलटी झाली. या बोटीत 9 प्रवासी होते.

बोरी नदीतील या बोटीत चालकासह 10 प्रवासी होते. त्यापैकी 7 जण पाण्यातून जिवंत सुखरुप बाहेर आले, तर 3 प्रवाशांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एक मुलगी पाण्यातून बाहेर काढून उपचारादरम्यान दवाखान्यात मरण पावली तर 2 मुले पाण्यातच बुडून मयत झाले आहेत. त्यापैकी एका मुललीला पाण्यातून 12:20 वाजता बाहेर काढण्यात आले आखणी एक मुलगा पाण्यात असून त्याला बाहेर काढण्याचे शोधकार्य अद्यापही सुरूच आहे.

मागे

कानपूरमध्ये एक्स्प्रेसचे १२ डब्बे रुळावरुन घसरले,२० प्रवासी जखमी
कानपूरमध्ये एक्स्प्रेसचे १२ डब्बे रुळावरुन घसरले,२० प्रवासी जखमी

उत्तरप्रदेशच्या कामपूरमध्ये शुक्रवारी रात्री हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्....

अधिक वाचा

पुढे  

जेटच्या 'लँडिंग'नंतर माणुसकीचं 'टेक ऑफ'; कर्मचाऱ्यांच्या मदतीला सोशल मीडिया
जेटच्या 'लँडिंग'नंतर माणुसकीचं 'टेक ऑफ'; कर्मचाऱ्यांच्या मदतीला सोशल मीडिया

केवळ देशाच्याच नव्हे, तर जगाच्या आकाशात भरारी घेणारी भारतीय विमान कंपनी जे....

Read more