ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'गेट वे' जवळ बोट बुडाली; पन्नास जण मोठ्या संकटातुन वाचले

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 01:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'गेट वे' जवळ बोट बुडाली; पन्नास जण मोठ्या संकटातुन वाचले

शहर : मुंबई

           मुंबई - मुंबईच्या समुद्रात मोठी बोट दुर्घटना टळली आहे. पर्यटक बोटीतील 50 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळ रविवारी संध्याकाळी ही थरारक घटना घडली. पर्यटक बोटीवर वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होतं. त्यावेळी अचानक ही बोट बुडू लागली. यावेळी बोटीत 50 जण होते. त्यामुळे एकच धावपळ सुरु झाली.  


          बोटीत पाणी येत असल्याने पर्यटक घाबरले. पर्यटकांनी आरडाओरड केल्याने गेट वे जवळच्या अन्य बोटींना या दुर्घटनेची माहिती समजली. काही पर्यटकांनी उड्या मारुन जीव वाचवला. तर स्थानिक कोळ्यांनी पर्यटकांची सुटका केली. या बोटीला परवानही होती का याची चौकशी सुरु आहे.

 

            टाइस नावाच्या कॅटामरान बोटीतून 35 पाहुणे आणि 10 कर्मचारी प्रवास करत होते. गेट वे ऑफ इंडियापासून काही अंतरावर भर समुद्रात वाढदिवसाचा जल्लोष सुरु असताना बोटीत पाणी भरायला सुरुवात झाली आणि एकच गोंधळ उडाला. सर्वांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला.


         सुदैवाने एलिफंटा बेटाजवळ ‘अष्टविनायक’ बोटीतील कर्मचाऱ्यांनी बुडणारी बोट आणि प्रवाशांचा आक्रोश ऐकला आणि ते मदतीला धावले. बुडणाऱ्या टाईस बोटीतील सर्व 50 जणांची सुटका करण्यात आली. भीतीमुळे गाळण उडालेल्या अनेक प्रवाशांची तब्येतही बिघडली होती. या घटनेनंतर पार्टीचे आयोजक आणि बोटीवरील मॅनेजर पसार आझले आहेत. पोलिसांनी निष्काळजीपणाचा कोणताही गुन्हा अद्याप नोंदवलेला नाही.

मागे

मूंब्रातील सात गोदामांना भीषण आग
मूंब्रातील सात गोदामांना भीषण आग

      ठाणे - मूंब्रा परिसरात काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घ....

अधिक वाचा

पुढे  

सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ; शेअरबाजार मात्र थंड 
सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ; शेअरबाजार मात्र थंड 

    मुंबई - अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात....

Read more