ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

एसबीआयच्या खेर्डी शाखेतून कोट्यवधीचे कर्ज काढून कुटुंब फरार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 05:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एसबीआयच्या खेर्डी शाखेतून कोट्यवधीचे कर्ज काढून कुटुंब फरार

शहर : रत्नागिरी

          चिपळूण - बँक मॅनेजरला हाताशी धरून कोटय़वधीचे कर्ज काढून संपूर्ण कुटुंब फरार झाल्याचा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खेर्डी शाखेत घडला आहे. या प्रकाराची बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीसाठी पथक चिपळूणमध्ये दाखल झाले आहे. विशेष म्हणजे बँकेसह पतसंस्था व खासगी सावकारांनाही गंडा घातला असून ही रक्कम कोटय़वधीची असल्याची माहिती राजकुमार छाजेड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


          छाजेड यांनी मुंबई येथील बँकिंग विभागाच्या लोकपालांकडेही तक्रार केली आहे. यासंदर्भात त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुठल्याही नोकरीवर नसताना बनावट कागदपत्रे सादर करून शहरातील एका बिल्डरकडून सदर कुटुंबाने पाच फ्लॅट खरेदी केले. हेच फ्लॅट खासगी सावकारांकडे ठेऊन पुन्हा लाखो रूपये उकळले. फ्लॅट खरेदी करताना बिल्डरचीही यामध्ये फसवणूक करण्यात आली आहे. या व्यवहारात बिल्डरला पूर्ण रक्कम मिळालेली नाही. पुन्हा एका फ्लॅटमध्ये पाच विविध उद्योग दाखवून लाखो रूपयांचे कर्ज लाटले गेले आहे. ही रक्कम दोन कोटीच्या घरात असून हा प्रकार उघडकीस येताच स्टेट बँकेने दखल घेत वरिष्ठ अधिका-यांकडून चौकशी सुरू केली आहे.


          याच फसवणुकीत दुस-या व्यक्तीला एन. आर. आय. दाखवून त्याच्या नावे 50 लाखांचे कर्ज लाटण्यात आले आहे. ही फसवणूक लक्षात येताच त्याने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. सदर बँकेत कमिशन देणा-या व्यक्तींना तातडीने कर्ज मिळत होते. पाच फ्लॅटचे बनावट कर्ज देताना फ्लॅटचे बांधकाम सुरू आहे. तरीसुध्दा फर्निचरचे कर्ज देण्यात आले आहे, तर कर्ज मंजूर झालेल्या प्रकरणात कमिशन न दिल्याने फायली प्रलंबित केल्या आहेत. 


         यासंदर्भात आपण हा प्रकार पुराव्यानिशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या लक्षात आणून देताच चौकशी वेगाने सुरू झाली आहे. सदर बँकेचे विशेष ऑडीट सुरू झाले असून वरिष्ठ अधिका-यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. अफरातफरीचा तपास ऍन्टी करप्शन विभागाने करावा, अशी मागणी आपण केली आहे.


           कोटयवधीचा गंडा घालणाऱया या व्यापाऱयाने चिपळूण शहरातून आपल्या कुटुंबियासह पलायन केले आहे. मी दाऊद इब्राहीमचा नातेवाईक असून माझ्याशी पंगा घेतल्यास बघून घेईन या आशयाची धमकी तो देत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देऊन याप्रकरणी गुन्हा अन्वेशषण शाखेकडे तपास देण्याची मागणी करण्यात आली असल्याचेही त्यांनी या पत्रकात नमूद केले आहे.


         दरम्यान, लोकपाल, रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केल्यानंतर त्याची प्रत स्टेट बॅंकेच्या प्रधान कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. नियंत्रण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिका-यांमार्फत या तक्रारीची चौकशी केली जाणार असून यामध्ये कोणी व्यक्ती दोषी आढळतीलल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पत्र चिपळूण शाखेच्या मुख्य प्रबंधकांनी छाजेड यांना दिले आहे. यासंदर्भात खेर्डी शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
 

मागे

समुद्रात गाडी धुणे पडले महागात
समुद्रात गाडी धुणे पडले महागात

             रत्नागिरी - समुद्राच्या पाण्यात गाडी धुण्याचा अतिउत्साह....

अधिक वाचा

पुढे  

महाडच्या आंबेडकर कॉलेज मध्ये प्राध्यापकांच्या दोन गटात हाणामारी
महाडच्या आंबेडकर कॉलेज मध्ये प्राध्यापकांच्या दोन गटात हाणामारी

           अलिबाग - रायगड जिल्ह्यातील महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर म....

Read more