ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इराकमधील २५ हजार भारतीयांचे भवितव्य धोक्यात ?

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 12:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इराकमधील २५ हजार भारतीयांचे भवितव्य धोक्यात ?

शहर : विदेश

       एरबिल - इराकमधील अमेरिकेचे दुतावास आणि सैन्य इराणकडून लक्ष्य केले जात असताना इराकमध्ये काम करणाऱ्या जवळपास २५ हजार भारतीय कामगारांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अमेरिका आणि इराणमधील सध्याचं संघर्षमय वातावरण पाहता इराकमधील भारतीय कामगार इराक सोडण्याच्या तयारीत आहेत. पण त्यांना मायदेशात आणण्यासाठी तातडीचे प्रयत्न केले जावेत या मागणीनं जोर धरला आहे.


        'दी तेलंगना गल्फ एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशन'ने गुरुवारी सायंकाळी ६ वाजता इराकच्या एरबिलमधील भारतीय दुतावासात जमण्यास सांगितलं आहे. भारतीय दुतावासाने इराकमधील अधिकाऱ्यांवर दबाव आणून तेथील भारतीय कामगारांना मायदेशी पाठवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं एम्प्लॉइज वेलफेअर असोसिएशनचं म्हणणं आहे. भारतीय दुतावासाने सध्या इराकमधील भारतीयांना पुढील सुचनेपर्यंत प्रवास टाळण्याचे आदेश दिले आहेत.


       'आम्ही इथे अतिशय भयानक परिस्थितीचा सामना करत असून दिवसेंदिवस परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. अमेरिकी सैनिकांना इथं लक्ष्य केलं जात आहे. एरबिलमधील भारतीय दुतावासाजवळ तेलंगनाचे कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याची आशा आहे. दूतावासाकडून इराकमधील भारतीयांना सतर्कतेचे आणि युद्धग्रस्त देशात प्रवास करण्याचं टाळण्याच्या सुचना देण्यात आली आहे', असं तेलंगना वेल्फअर असोसिएशनचे उपाध्यक्ष रामचंदर यांनी सांगितलं.
 

मागे

या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण उद्या दिसणार 
या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण उद्या दिसणार 

       मुंबई - या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी द....

अधिक वाचा

पुढे  

कला ,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकांवर उपासमारीची वेळ  
कला ,क्रीडा,कार्यानुभव शिक्षकांवर उपासमारीची वेळ  

         राज्यातल्या कला, क्रीडा, कार्यानुभवाच्या शिक्षकांवर उपासमारी....

Read more