ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

प्रवचनकाराने विवाहित महिलेला पळविले

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रवचनकाराने विवाहित महिलेला पळविले

शहर : भंडारा

              भंडारा : भंडारा तालुक्यातील मोहदूरा येथे भागवत सप्ताहासाठी बोलवण्यात आलेल्या महाराजाने  थेट विवाहित महिलेला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तसेच या महाराजाचे नाव दिनेशचंद्र मोहतुरे आहे. आपल्या जीवनाची दिशा सांगणार्‍या महाराजनेच विवाहित महिलेला पळवून नेल्याने संपूर्ण गावात चर्चा होत असल्याचे समजते.

            दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोहदूरा येथे २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत भागवत सप्ताहाचे आयोजन करण्याचे गावकर्‍यांनी ठरविले होते. भागवत सप्ताहात प्रवचन करण्यासाठी सावनेरच्या दिनेशचंद्र मोहतुरे या तरुण महाराजाला बोलवण्यात आले. हा महाराज गेल्या वर्षीही मोहदूरा येथे प्रवचनासाठी आला होता. त्यादरम्यान, त्याचे गावातीलच एका तरुण विवाहित महिलेशी सूत जुळले होते. त्या महाराजाने महिलेच्या कुटुंबियांशीही जवळीकता निर्माण केली. त्यांच्या घरी मुक्कामही केला होता. या महाराजाच्या गोडगोड बोलण्याने गावकऱ्यांना भुरळ घातली होती. 

         ३ फेब्रुवारीला भागवत सप्ताहाचा समारोप झाल्याने महाराज त्याच्या गावी निघून गेला. दोन दिवसांनी महाराजाचा एक माणून दुचाकीसह गावात दाखल झाला. त्याने संबंधित महिलेच्या घरासमोर दुचाकी थांबवली. महिला घरातून निघाली आणि त्या दुचाकीवर बसून निघून गेली. रात्री पत्नी घरात नसल्याचे कळताच पती आणि सासऱ्यांनी तिची शोधा-शोध केली. घरच्यांना या दोघांच्या संबंधाची कल्पना होतीच, त्यामुळे त्यांनी ताबडतोब भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली.

         भंडारा पोलिसांनी महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवून तपासासाठी महाराजाच्या गावी धाव घेतली. मात्र,  कुणीही आढळून आले नाही. भंडारा पोलीस या दोघांचा तपास करीत आहेत. 

मागे

SRA च्या 13 हजार बेकायदा रहिवाशांना 48 तासाची मुदत, पुरावे न दिल्यास घरं सोडावी लागणार
SRA च्या 13 हजार बेकायदा रहिवाशांना 48 तासाची मुदत, पुरावे न दिल्यास घरं सोडावी लागणार

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ल....

अधिक वाचा

पुढे  

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?

आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. दैनंदिन जीवनात आपल्या व्हॅलें....

Read more