ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

गणेशोत्सव 2019 : बदलापुरात तृतीयपंथीयांच्या घरी गणपतीची स्थापना

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 06:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गणेशोत्सव 2019 : बदलापुरात तृतीयपंथीयांच्या घरी गणपतीची स्थापना

शहर : ठाणे

भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात श्री गजाननाची विधिवत स्थापना करण्यात आली असून गणेशोत्सवाच्या मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. यात तृतीयपंथीयही मागे नसल्याचे दिसून आले. बदलापूरात तृतीयपंथीयांच्या गुरु श्रीदेवीच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे

अवघ्या 10 बाय 10 फुटाच्या खोलीत राहणार्‍या श्रीदेवीच्या घरी अनेक वर्षापासून गणपतीची स्थापना करण्यात येत आहे. तसेच यल्लमा देवीचीही पूजा केली जाते. मुंबई ठाण्यातील बहूतांशी तृतीयपंथीय श्री देवीकडे या निमिताने गणेशाच्या दर्शनाला येतात. त्याचबरोबर आजूबाजूचे रहिवाशी व व्यापारीही येतात. येणार्‍या भाविकांचा पाहुणचार करण्यात कोणतीही कमतरता ठेवली जात नाही. येणार्‍या प्रत्येकाला जेवण आणि प्रसाद दिला जातो, असे श्रीदेवीने सांगितले.

 

मागे

गणेशोत्सव 2019 : 'शिवशाही'च्या सावळ्या गोंधळामुळे प्रवासी त्रस्त
गणेशोत्सव 2019 : 'शिवशाही'च्या सावळ्या गोंधळामुळे प्रवासी त्रस्त

'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे एसटीचे ब्रीदवाक्य. त्यानुसार गेली 7 दशके प्रव....

अधिक वाचा

पुढे  

उरणच्या ओएनजीसी प्लांटला आग
उरणच्या ओएनजीसी प्लांटला आग

रायगड मधील उरण येथे असलेल्या ओएनजीसी गॅस प्लांटला आज सकाळी 7 च्या सुमारास आग....

Read more