ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

गाडीला फास्टॅग लावण्याची 'ही' शेवटची तारीख, गडकरींचा इशारा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: फेब्रुवारी 14, 2021 01:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गाडीला फास्टॅग लावण्याची 'ही' शेवटची तारीख, गडकरींचा इशारा

शहर : देश

15 फेब्रुवारीपासून वाहनांना फास्टॅग लावणे गरजेचे आहे. ही शेवटची तारीख असल्याचं केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नागपुरात म्हटलंय. नागरिकांना फास्ट टॅग लावण्यासाठी अडचण जाऊ नये यासाठी टोल नाक्याच्या बाजूलाच फास्टॅगच्या विक्रीची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर वाहनांना फास्टॅग लावून घ्यावा असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय.

सर्व चारचाकी (Four Wheelers) वाहनांसाठी जानेवारी २०२१ पासूनफास्टॅग (fastag) अनिवार्य केलाय. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले असून यामध्ये जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठीफास्ट टॅग अनिवार्य करण्यात आलाय.. विशेष म्हणजे हा नियम डिसेंबर २०१७ च्या अगोदर खरेदी झालेल्या वाहनांसाह M आणि N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे.

विना फास्टॅग वाहनांनी फास्टॅग मार्गिकेचा वापर केला तर वाहनांना दुप्पट टोल आकारण्यात येतो. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवर टोलनाक्यांवर फास्टटॅग लेन सुरू झालंय. या योजनेमुळे टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस आणि झटपट होतो.

सुरुवातीला टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

वाहनावर फास्टॅग बसवण्यात आल्यानंतर टोलनाक्यावर येताच तेथील सुसज्ज अशा रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टोलनाक्यांवर बसवण्यात आलेले सेन्सर वाहनावरील टॅग वाचेल टोलचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून जातात. पैसे खात्यातूच जाताच वाहनधारकाला नोंदणी असलेल्या मोबाइल क्रमांकावर त्याची माहिती मिळते

पुढे  

उद्यापासून लसीचा दुसरा डोस देणार, जाणून घ्या प्रक्रिया
उद्यापासून लसीचा दुसरा डोस देणार, जाणून घ्या प्रक्रिया

उद्यापासून राज्यासह मुंबईत लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू होत आह....

Read more