ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी आत्महत्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 22, 2021 10:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी आत्महत्या

शहर : पुणे

टिकटॉक स्टार (TikTok) समीर गायकवाड (Sameer Gaikwad)  याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.  रविवारी सायंकाळी राहत्या घरी आत्महत्या केल्याने एकच गोंधळ उडाला आहे. प्रेमप्रकरणातून त्याने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे.

घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समीरच्या मित्राने नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलिसांना याबाबत सांगण्यात आलं. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड राहातो.  रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे.पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये समीर गायकवाड शिकत होता. म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवणारा समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याची रेडलाईट डायरीज ही ब्लॉगवरील मालिका चांगलीच गाजली होती. तो टिकटॉक स्टार म्हणूनही तरुणांमध्ये लोकप्रिय होता.

मात्र समीरने उचललेल्या पाऊलामुळे त्याच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

मागे

CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष....

अधिक वाचा

पुढे  

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा भांडाफोड, मोठ्याप्रमाणात शस्त्र - दारूगोळा जप्त
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांचा भांडाफोड, मोठ्याप्रमाणात शस्त्र - दारूगोळा जप्त

दहशतवादी कारवाईबाबत जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे. जम्म....

Read more