ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Toll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5 ते 25 रुपयांची वाढ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 12:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Toll Rate | मुंबईकरांवर आता टोलचा बोजा, टोल दरात 5 ते 25 रुपयांची वाढ

शहर : मुंबई

आधीच कोरोनामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे (Toll Rate Increases). त्यात आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून मुंबईतील्या टोल दरांमध्येही वाढ करण्यात आली आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरील टोलच्या दरात 5 ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे कोरोनामुळे आधीच आर्थिक परीस्थितीला तोंड देणाऱ्या मुंबईकरांवर आता वाढीव टोलचाही बोजा येणार आहे (Toll Rate Increases).

मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके आहेत. शहरातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीच्या खर्च 2002 ते 2027 या 25 वर्षांत वसुलीसाठी हे टोलनाके उभारण्यात आले आहे. एमईपी कंपनी आणि राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलच्या दरात वाढ होत असते. त्यानुसार, आता 1 ऑक्टोबरपासून टोल दरात वाढ होणार आहे.

नवीन दरांनुसार हलक्या वाहनांच्या टोल दरात पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता टोलचा 35 रुपयांवरुन 40 रुपये होईल. तर, प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन त्यासाठी आता 65 रुपये मोजावे लागणार आहे. ट्रक आणि बसच्या टोल दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यासाठी आता 105 नाही तर 130 रुपये द्यावे लागणार आहेत (Toll Rate Increases).तर अवजड वाहनांच्या टोल दरातही 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यासाठी 160 रुपये असा वाढीव टोल द्याला लागणार आहे. हलक्या वाहनांच्या मासिक पासमध्येही वाढ करण्यात आली आहे. पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पाससाठी आता 1400 रुपयांऐवजी 1500 रुपये मोजावे लागणार आहे.

टोलचे नवे दर

छोटी वाहने – 40 रुपये

मध्यम अवजड वाहने – 65 रुपये

ट्रक आणि बसेस – 130 रुपये

अवजड वाहने – 160 रुपये

हलक्या वाहनांसाठी मासिक पास – 1500 रुपये

 

मागे

ड्रग्ज प्रकरण : चॅट लीकवरील प्रश्नांवर व्हॉट्सअॅपनं दिलं स्पष्टीकरण
ड्रग्ज प्रकरण : चॅट लीकवरील प्रश्नांवर व्हॉट्सअॅपनं दिलं स्पष्टीकरण

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्य....

अधिक वाचा

पुढे  

शहीद जवान नरेश बडोले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
शहीद जवान नरेश बडोले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर आज डिगडोह स्मशानभूमी येथे शा....

Read more