ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 11, 2020 12:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या मुंबईची स्थिती काय?

शहर : मुंबई

देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेलं ठिकाण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबई. एकट्या मुंबईत आतापर्यंत 876 कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात 54 जणांचा मृत्यू झाला आहे (Details of every Corona Hotspot in Mumbai). त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्कपणे काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोना संसर्गाच्या प्रमाणानुसार मुंबईत काही हॉटस्पॉट ठरवण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने परिसर सील बंदही केला आहे.

मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट लक्षात घेता राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनानं मुंबईतील चार विभाग हे अतिगंभीर म्हणून घोषित केले आहेत. यापैकी जी साऊथमध्ये लोअर परेल आणि वरळीचा परिसर, ई वॉर्डमध्ये भायखळा, भायखळा फायर ब्रिगेड आणि आसपासचा भाग, डी वॉर्डमध्ये नाना चौक ते मलबार हिल परिसर आणि के वेस्ट वार्डात अंधेरी पश्चिमचा भाग यांचा समावेश आहे. आता हे चारही विभाग संपूर्णपणे सील करण्यात आले आहेत.

मुंबईच्या जी साऊथ वार्डातील कोरोना रुग्णांची संख्या 199 पर्यंत पोहचली आहे. ई वार्डात 69, डी वार्डात 61, के वेस्ट वार्डात 51 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणांकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, आज (10 एप्रिल) महाराष्ट्रात 16 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 364 वरुन 1 हजार 380 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 16 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या ही 1 हजार 380 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यात मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर आणि ग्रामीण, तसेच पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

मागे

Coronavirus : लॉकडाऊन पुढे ढकलण्याबाबत मोदी-मुख्यमंत्र्यामध्ये चर्चा
Coronavirus : लॉकडाऊन पुढे ढकलण्याबाबत मोदी-मुख्यमंत्र्यामध्ये चर्चा

जगभरात कोरोना व्हायरसमुळे १,००,००० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. यात....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात सायबर विभागाकडून १६१ गुन्हे दाखल
राज्यात सायबर विभागाकडून १६१ गुन्हे दाखल

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई अत्यंत प्रभावीपणे सुर....

Read more