ठळक बातम्या आयुर्वेदानुसार रुईच्या झाडाचे पान आहे आरोग्यासाठी फायदेमंद, हा गं’भी’र आजारही कायमस्वरूपी दूर करतो !.    |     टायफाइड असल्यास, हे उपाय केल्यानं मुळातून टायफाईड जाणार.    |     कापराच्या तेलाचे जादुई फायदे.    |     आर्थिक स्थिती मजबूत होईल जर घरात वाहणार सकारात्मक ऊर्जा.    |     हृदयविकारांच्या झटक्यापासून वाचवणार हे घरगुती औषध.    |    

दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 17, 2020 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दुर्गेचं हे नवं रुप पाहिलंत का?

शहर : देश

देशभरात आजपासून नवरात्रौत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. कोलकात्यामधील नवरात्रौत्सव हा नेहमीच विशेष आकर्षणाचा विषय असतो. कोलकात्यात अनेक ठिकाणी मंडपांमध्ये देवीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या मंडपांमध्ये करण्यात येणारी सजावटही पाहण्यासारखी असते.

यंदादेखील दुर्गेच्या एका मूर्तीमुळे कोलकात्यामधील नवरात्रौत्सव चर्चेचा विषय ठरत आहे. बेहला येथील बरिशा क्लबने यंदा दुर्गेच्या अनोख्या रुपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. आपल्या मुलांना कडेवर घेऊन जाणारी स्थलांतरित महिलेच्या रुपातील ही दुर्गा अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

रिंतू दास यांनी ही मूर्ती साकारली आहे. कोरोना संकटाच्या काळात रस्त्यावरुन जाणारे स्थलांतरित महिलांचे तांडे पाहून आपल्याला ही कल्पना सुचल्याचे त्यांनी सांगितले. कोणाच्याही मदतीशिवाय मुलांना घेऊन रस्त्यावरुन चालणाऱ्या या महिलांमध्ये मला दुर्गा दिसल्याचे दास यांनी म्हटले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. यानंतर शहरांतील मजुरांचे तांडे रोजगार नसल्याने आपल्या गावी निघाले होते. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची सर्व साधने बंद असल्याने लाखो मजुरांना आपल्या गावापर्यंत पायी चालत जावे लागले होते. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला होता. रस्त्यावरुन कोणत्याही मदतीशिवाय चालत गेलेल्या या मजुरांच्या कुटुंबीयांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता.

कोल्हापुरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात 8 वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना झाली. श्री पूजक शेखर मुनींश्वर आणि स्मिता मुनींश्वर यांच्या हस्ते सर्व विधी पार पडले. अंबाबाईच्या मंदिरातील नवरात्रौत्सव इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मंदिर बंद असले तरी बाहेरून भाविक देवीच्या दर्शनासाठी धडपड करताना दिसत आहेत.

मागे

ईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार; अजित पवार पुन्हा गोत्यात?
ईडी सिंचन घोटाळ्याची चौकशी करणार; अजित पवार पुन्हा गोत्यात?

राज्य सरकारने एकीकडे जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी सुरू करण्याचा निर्ण....

अधिक वाचा

पुढे  

आता 'या' ही मार्गावर धावणार शिवशाही, प्रवाशांना दिलासा
आता 'या' ही मार्गावर धावणार शिवशाही, प्रवाशांना दिलासा

एसटी वाहतूक सेवा सुरू केल्यानंतर आता शिवशाहीदेखील रस्त्यावर धावणार आहेत. त....

Read more