ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बिद्रेवाडीत ट्रान्सफरमर कोसळला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 30, 2019 03:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे बिद्रेवाडीत ट्रान्सफरमर कोसळला

शहर : बेळगाव

बेळगाव – हुककेरी तालुक्यात बिद्रेवाडी गावातील शेतकरी राजू मारयाळ यांच्या शेतातील इलेक्ट्रिक ट्रान्सफार्म जोरदार कोसळलेल्या पावसामुळे रात्रीच्या सुमारास कोसळला. जर तो दिवसा कोसळला असता तर मोठी जीवित हानी झाली असती. वीज कंपनीच्या निष्काळ्जीपणामुळे हा ट्रान्सफरमर पडल्याचे शेतकर्‍यांचे मत आहे. 
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,बिद्रेवाडीत बहुसंख्य शेतकरी उस,सोयाबीन,मका,पीक घेत असतात.त्यासाठी लागणारे पाणी वीजपंपाच्या आधारे पुरविले जाते या करिता इलेक्ट्रिक ट्रान्सफार्म राजू मारयाळ यांच्या शेतात उभारण्यात आला होता. या ट्रान्सफार्मचा खांब जेमतेम फुट-दीड फुट खड्डा करून मातीत पुरलेला दिसत होता.जर दीड-दोन मीटर खडा करून बांधकाम करून हा खांब पुरला गेला असता आणि एक-दीड फुट सीमेंटचा थर खड्यावर खांबाला लावला गेला असता तर खांब मजबूत स्थितीत राहिला असता. मात्र तो केवळ मातीतच कमी उंचीत उभा केल्याने कोसळला. त्यात सुदैवाने रात्र होती म्हणून बरे दिवस असता तर शेतात काम करण्यासाठी गेलेले त्याखाली सापडून जीवित हानी झाली असती. आता तरी वीज कंपनीने तो खांब पुन्हा उभा करताना पुरेशी दक्षता घ्यावी असे ग्रामस्थानचे म्हणणे आहे.

मागे

आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली, पंतप्रधानांची 'मन की बात'
आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली, पंतप्रधानांची 'मन की बात'

आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली. नागरिकांचे हक्क काढून घेण्यात आल्याचा प....

अधिक वाचा

पुढे  

प्लॅस्टिक बंदी पुन्हा सुरू
प्लॅस्टिक बंदी पुन्हा सुरू

गेल्या वर्षी सुरू झालेली आणि निवडणूक धामधुमीत गायब झालेली प्लॅस्टिक बंदी म....

Read more