By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 19, 2019 10:01 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पालघर
चिंचणी गावातील देमनभाट येथे राहणारी पिंकी हरजी माढा या महिलेचा मृतदेह वरोर गावाच्या टिघरेपाड्याजवळ शेतातील एका पडक्या घरात सापडला. वांनगाव पोलिसांनी पिंकीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदनासाथी पाठविला असता अहवालानुसार पिंकीचा अति मद्यप्राशनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पिंकी आणि तिचा पती हरेश उर्फ काळ्या सावजी वंगड हे दोघेही मद्यप्राशन करून काम मिळविण्यासाठी गावात फिरत असत. कामातून मिळेल त्या पैशात पुन्हा मद्य प्राशन करून कुठेही झिंगून पडून राहत. गेला आठवडाभर ते दोघेही या पडक्या घरात पडून होते. पिंकीचा मृत्यू झाल्याने घाबरून तिचा पती पळून गेला असावा, असा पोलिसांचा तर्क आहे.
विमानतळ परिसर रहिवाशी एक्ता संघातर्फे मुंबई विमानतळ परिसरातील 80 हजार झोपड....
अधिक वाचा