ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तुकाराम मुंढेंचा हिसका,आदेशाला झुगारून काम करणाऱ्या खासगी कंपनीला थेट लाखाचा दंड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 24, 2020 02:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तुकाराम मुंढेंचा हिसका,आदेशाला झुगारून काम करणाऱ्या खासगी कंपनीला थेट लाखाचा दंड

शहर : नागपूर

संचारबंदीच्या काळात शटर ओढून कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेणाऱ्या खासगी कंपनीला, नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे. प्रशासनाच्या आदेशाला झुगारून काही खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे. असा आदेश झुगारणाऱ्या दोन कंपन्यांना मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दीड लाखांचा दंड ठोठावला. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

शहरातील सर्व खासगी, कॉर्पोरेट आणि अन्य आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेले आहे. असे असतानाही वर्धमान नगर येथील ठवकर कंपनीतील सुमारे 60-70 कामगारांना कामावर बोलावण्यात आले होते. कंपनीचे शटर बंद ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते.

मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे याबाबत माहिती मिळताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव आणि उपद्रव शोध पथकाच्या चमूने या कंपनीवर धाड टाकली. तक्रारीनुसार तेथे सुमारे 60-70 कर्मचारी काम करताना आढळून आले. कोरोना संदर्भात साथ रोग नियंत्रण कायद्याखाली मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच, मनपाच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

बजाज शो रुमवरही कारवाई

वर्धमान नगरमधीलच हनी सागर अपार्टमेंट इथे बजाजचे शो रुम आहे. याठिकाणीसुद्धा मागील गेटने कामगारांना आत घेऊन तेथे काम सुरू ठेवण्यात आले होते. याबाबतही मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तेथेही धाड मारली. आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच शो रुम मालकाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वेळोवेळी सांगूनही जर नागरिक कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा आणि मनपा प्रशासन दिवसरात्र एक करीत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या आदेशाला झुगारून काही खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे. याशिवाय अनेक वाहनेही रस्त्यावर दिसत आहेत. त्यामुळे अशांवर कारवाई करण्याची वेळ आली आहे.

मागे

कोरोनाच्या नावाखाली सोशल मीडियावर अफवा,काही शंका असेल तर या नंबरवर फोन करा
कोरोनाच्या नावाखाली सोशल मीडियावर अफवा,काही शंका असेल तर या नंबरवर फोन करा

दूध केवळ सकाळी ६ ते ८ या दोन तासांच्या वेळेतच मिळणार, भाज्या खरेदीची वेळ सका....

अधिक वाचा

पुढे  

घरीच थांबा, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारा : अजित पवार
घरीच थांबा, ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारा : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्....

Read more