ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

मुंबई-गोवा महामार्गावर बस अपघातात २० जखमी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 25, 2020 03:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-गोवा महामार्गावर बस अपघातात २० जखमी

शहर : रायगड

       रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर माणगावजवळ कळमजे येथे एसटी बस पुलावरुन कोसळून झालेल्या भीषण अपघातात २० प्रवासी जखमी झाले. या जखमींवर माणगाव रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

           यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुंबईतील परळ एसटी डेपोतून ही बस दापोलीकडे जात होती. ही बस पहाटे साडेपाचच्या सुमारास माणगावजवळील कळमजे येथे आली. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. या दुर्घटनेचे वृत्त कळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या बसमध्ये असलेल्या ४४ प्रवाश्यांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले. यात २० जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील २ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, मात्र सर्व प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.  

मागे

कुर्ला येथे लागलेली आग आटोक्यात 
कुर्ला येथे लागलेली आग आटोक्यात 

        मुंबई - कुर्ला (पश्चिम) येथील आंबेडकरनगर परिसरातील मेहताब को-ऑप....

अधिक वाचा

पुढे  

तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे झटके; १८  ठार, ५०० जखमी
तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे झटके; १८ ठार, ५०० जखमी

          अंकारा - तुर्कस्तानच्या पूर्वेकडील प्रांतामध्ये ६.८ रिश्टर स्....

Read more