ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कांद्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 05:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कांद्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी

शहर : नाशिक

           नाशिक - लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने पुन्हा उसळी घेतली. सोमवारच्या तुलनेत एक हजार रुपयांची प्रती क्विंटलमागे आज वाढ होत ११ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. लाल कांद्याला ११ हजार १११ प्रति क्विंटलला इतका उच्चांकी बाजारभाव मिळालाय. तर १६ डिसेंबर रोजी लाल कांद्याला १० हजार ९९ रुपयांचा दर मिळाला होता.

          एकीकडे केंद्र सरकार इजिप्त आणि तुर्की या देशातून २१ हजार मेट्रिक टन कांदा आयात करत आहे, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी कांदा साठवणूक करू नये यासाठी त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. विकिरण प्रक्रियेमुळे कांदे सडण्याची प्रक्रिया कमी होते. मात्र, खर्चिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवली. त्यामुळे या केंद्रात आता कांद्याऐवजी हापूस आंब्यावर प्रक्रिया केली जाते. 

     किरणोत्सर्गासाठी येणारा खर्च तसंच किरणोत्सर्गानंतर कांदे डोंगळयाला वापरता येत नसल्यानं शेतकऱ्यांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरवलीय. कांद्याचा भाव स्थिर ठेवण्यासाठी केवळ हा एकच प्रकल्प नव्हे तर केंद्राचे इतरही अनेक निर्णय अपयशी ठरलेत.
 

मागे

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा
निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा

            नवी दिल्ली - निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींपै....

अधिक वाचा

पुढे  

सांताक्रूझमधील अनधिकृत बड्या धंदेवाल्यांना एच/पूर्व महापालिकेचे अभय
सांताक्रूझमधील अनधिकृत बड्या धंदेवाल्यांना एच/पूर्व महापालिकेचे अभय

                 मुंबई - सांताक्रूझमधील रस्त्यावरील पदपथ अनेक अनधिक....

Read more