ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सतारकरांची तहान भागवण्यासाठी खासगी टँकरची मदत 

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 02:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सतारकरांची तहान भागवण्यासाठी खासगी टँकरची मदत 

शहर : सातारा

मे महिन्यामध्ये कास तलावाचा आटलेला विसर्ग यामुळे सातारा शहरात पाणीबाणी निर्माण झाली आहे. असे असताना पालिकेच्याचा नोझल फिल्टर खराब झाल्याने पालिकेला सातारकरांची तहान भागवण्यासाठी खाजगी टँकरची मदत घेण्याची वेळ आली आहे. फिल्टरच्या दुरुस्तीला कोल्हापूर गाठण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले.
सातार्‍यात निर्माण झालेली पाणीबाणी आणि मॉन्सूनच्या लांबलेल्या आगमनाची मिळालेली वर्दी यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची प्रचंड कसरत सुरू आहे. दहा द.ल.घ.मी पाण्याचा रोज उपसा व उन्हामुळे एक इंच होणारे पाण्याचे बाष्पीभवन यामुळे आधीच तहानलेल्या सातारकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असे असताना दुष्काळात तेरावा महिना म्हणावा की काय पाच हजार लीटर क्षमता असणारी पालिकेची फायर ब्रिगेडची गाडी नादुरुस्त झाली आहे. टँकरच्या पाईपचा प्रेशर नोझल फिल्टरच बिघडल्याने पाणी पुरवठा विभाग प्रचंड अडचणीत आला आहे. सध्या सातार्‍याच्या पश्चिम भागात अपुरा पाणीपुरवठा व घंटेवारीचे कोलमडलेले नियोजन यामुळे टँकरच्या पंचवीस ते तीस फेर्‍या होत आहे. मात्र चालकांच्या दोन च शिफ्ट असल्याने कामाचा खोळंबा होत आहे.
मात्र नोझल चा गंज आणि सर्विसिंगचा अभाव यामुळे ऐन उन्हाळ्यात सातार्‍यात पाणी टँकर उभा करण्याची व खाजगी टँकर मागवून सातारकरांची तहान भागवण्याची वेळ आली आहे. नोझल दुरूस्तीसाठी कोल्हापूरला पाठवण्यात आला आहे. खाजगी टँकर प्रतिफेरी तीनशे ते पाचशे रुपये दर आकारला जातो त्यामुळे खाजगी टँकरवाल्यांची मात्र चांदी झाली आहे. दीड हजार लीटरचे चार ट्रॅक्टर सध्या सातार्‍यात गोलाकार चकरा मारत आहेत.

मागे

चक्क! व्हेल माश्याने परत आणून दिला मोबाईल फोन
चक्क! व्हेल माश्याने परत आणून दिला मोबाईल फोन

नॉर्वेमधील हॅमरफेस्ट बेटसमुहांजवळ हा सर्व प्रसंग घडला. लॅडबीबल ग्रुप या यु....

अधिक वाचा

पुढे  

जमशेदपूरमध्ये एका भामट्याला बेदम मारहाण
जमशेदपूरमध्ये एका भामट्याला बेदम मारहाण

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी म्हणवणार्‍या एका तरुणाची महिलेने जा....

Read more