ठळक बातम्या मद्यपानाची सवय सोडण्यासाठी उपाय.    |     Tulsi Vivah 2020: अशी सुरु झाली तुळशी विवाहाची परंपरा, यंदा 'हा' आहे मुहुर्त.    |     धनतेरसला धणे का विकत घेतात? जाणून घ्या.    |     धनत्रयोदशी पूजा विधी आणि यमदीपदानाचे महत्त्व.    |     नरक चतुर्दशीला मारुतीचा जन्म झाला, या दिवशी काय करतात जाणून घ्या.    |    

दिवाळी उत्सवात दिल्लीमध्ये हवेची पातळी 'गंभीर'; या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2020 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिवाळी उत्सवात दिल्लीमध्ये हवेची पातळी 'गंभीर'; या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

शहर : देश

दिवाळी (Diwali 2020) मुळे यंदा वायू प्रदूषणात (Air Pollution) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने दिल्ली-एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता गंभीर ठप्प्यात पोहोचली आहे. इतकंच नाही तर, भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि नजिकच्या अनेक भागांमध्ये रविवारी हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम भागात हवामानातील अस्थिरतेमुळे हवामानात बदल होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि इतर काही राज्यांतही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये शनिवारी हवेची गुणवत्ता ‘गंभीर श्रेणीत होती. अशात अनेक भागांमध्ये फटाके फोडले गेल्याने प्रदूषणाचा धोका आणखी वाढला असल्याची माहिती देण्यात आली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वायु गुणवत्तेची देखरेख करणारी यंत्रणा ‘सफर च्या मते स्थानिक पातळीवरसुद्धा वायू प्रदूषणात वाढ झाली. याचा रविवारी आणि सोमवारी वाईट परिणाम पाहायला मिळू शकतो.

पश्चिमी भागातील हवामानात झालेल्या बदलांमुळे रविवारी हलका पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दिवाळीनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता सुधारण्याचीही शक्यता आहे. तर रविवारी वाऱ्याचा कमाल वेग 12 ते 15 किमी / तासाने राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईलाही प्रदूषणाचा सर्वाधिक धोका

सर्व प्रकारच्या वायू प्रदुषणात मुंबई आणि चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदुषित विभाग ठरली आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाचा सन 2019-20 या वर्षाचा अहवाल जाहीर झाला आहे. मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दरम्यानच्या, काळात महाराष्ट्रासह देशातील उद्योग बंद होते. रेल्वे, वाहतूक बंदी होती. त्यामुळं उद्योगांची चाकं थांबली. गाड्याची चाकं थांबली. यामुळे वातावरण ढवळून निघालं होतं.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणाची पातळी घसरली असली तरी पुन्हा मिशन बिगीन अगेन सुरू झाल्याने प्रदूषण वाढू लागलं आहे. चंद्रपूर आणि घुगुस या दोन ठिकाणी सर्वाधिक प्रदूषणात वाढ झाल्याचं प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

मागे

पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिव....

अधिक वाचा

पुढे  

दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; प्रत्येक तासाला 4 रुग्णांचा मृत्यू
दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; प्रत्येक तासाला 4 रुग्णांचा मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीमध्ये तासाला 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याची ....

Read more