ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुढेच्या 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2020 12:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुढेच्या 3-4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याकडून इशारा

शहर : मुंबई

गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली. शनिवारीही अनेक ठिकाणी विजांसह मुसळधार पाऊस झाल्याने 16 राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आजही राज्याच्या अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर पुढच्या काही तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाचं काम नसल्यास घरी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे 3-4 तास धोक्याचे असल्याचं सांगण्यात आलं आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आधीच कोरड्या जागी ठेवावा तर नागरिकांनीही विनाकारण बाहेर पडू नये.

दरम्यान, जालन्यात बऱ्याच तासापासून जोरदार पावसास सुरू आहे. शहरासह तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. परतूर शहरात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुसळधार पावसामुळे सोयाबीन, तुर, कापसाचे मोठ्या प्रमाणआत नुकसान झालं आहे.

11 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा , विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 16 जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मच्छिमारी करम्यासाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसातील पावसाच्या काळात शेतक-यांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असं हवामान विभाकडून सांगण्यात आलं आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आंध्र प्रदेशासह मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. 9 ते 12 ऑक्टोबर दरम्यान आंध्र प्रदेश, रायलसीमा, तामिळनाडुसह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्य मॉन्सूनची चाहूल लागली असून आसाम, मेघालय परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.

मागे

संरक्षण मंत्रालयाकडून अनिल अंबानींच्या कंपनीचे 2500 कोटींचे कंत्राट रद्द
संरक्षण मंत्रालयाकडून अनिल अंबानींच्या कंपनीचे 2500 कोटींचे कंत्राट रद्द

कर्जाच्या बोझ्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांना ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई पुन्हा थांबली; अनेक भागांत वीजपुरवठा खंडित
मुंबई पुन्हा थांबली; अनेक भागांत वीजपुरवठा खंडित

सोमवारी सकाळच्या सुमारास आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच आणि ऐन कार्याल....

Read more