ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची जागा घेणार, कोण आहेत अॅमेझॉनचे नवे सीईओ अँडी जेसी?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2021 10:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची जागा घेणार, कोण आहेत अॅमेझॉनचे नवे सीईओ अँडी जेसी?

शहर : विदेश

अ‍ॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस (Jeff Bezos) हे लवकरच कंपनीचं सीईओ पद सोडणार आहेत. त्यांच्या जागी अँडी जेसी (Andy Jassy) नवीन सीईओ होणार आहेत. अँडी जेसी सध्या अ‍ॅमेझॉनचे वेब सर्व्हिसेज (AWS)चीफ आहेत. 53 वर्षांच्या जेसी हे 1997 मध्ये अ‍ॅमेझॉनमध्ये रुजू झाले होते, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएचं शिक्षणही घेतलंय. (Who Is Andy Jassy The Next Ceo Of Amazon Replace Jeff Bezos Billionaire America)

खेळ आणि गाण्यांमध्ये विशेष आवड

जेसी यांचं लग्न रोचेल कॅप्लान यांच्याशी झालंय. त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत. त्यांना खेळ आणि गाण्यात विशेष आवड आहे. वर्षं 2006 मध्ये जेसी यांनी अॅमेझॉनच्या क्लाऊड सर्व्हिस प्लॅटफॉर्म अॅमेझॉन वेब सर्व्हिसेजची स्थापना केली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या एका पोडकास्टमध्ये जेसी म्हणाले होते की, ”मी मे 1997 मध्ये पहिल्यांदा शुक्रवारी एचबीएसचा अंतिम परीक्षा दिली होती. त्याच्या पुढच्याच सोमवारी मी अॅमेझॉनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेव्हा माझं काम काय असेल आणि मला पद काय मिळेल, याचा मी विचार केला नव्हता.”

30 वर्षांनंतर पद सोडणार बेजोस

जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी कंपनीचं सीईओपद सोडत असल्याची घोषणा केलीय. गेल्या 30 वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. त्यांनी एका ऑनलाईन बुक स्टोअरच्या स्वरूपात या कंपनीची स्थापना केली. ते आता कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

अ‍ॅमेझॉनची पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलरची रेकॉर्ड ब्रेक विक्री

वर्ष 2006 मध्ये जेसी यांनी अ‍ॅमेझॉन क्लाऊट सर्व्हिस प्लॅटफॉर्म ची स्थापना केली, जे जगभरात कोट्यवधी व्यावसायिक वापरतात. याचा थेट सामना मायक्रोसॉफ्टच्या Azure आणि अल्फाबेट इंकच्या गुगल क्लाउडशी आहे. जेसी सामाजिक प्रकरणातही वेगवेगळे ट्विट करत असतात. ते कृष्ण वर्षीय अधिकारी आणि एलजीबीटीक्यूंच्या अधिकारांवरही बोलत असतात. अ‍ॅमेझॉननं पहिल्यांदाच 100 अब्ज डॉलरची रेकॉर्ड ब्रेक विक्री मिळवली आहे.

2005 मध्ये झाला नफा

1995 मध्ये कंपनीला 1.64 कोटी रुपयांचा फायद्यासह 0.96 कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं. यानंतर 2000 मध्ये कंपनीला 11,868 कोटी रुपयांचा फायदा झाला आमि 0.96 कोटींचं नुकसान झालं होतं. पण 2005 मध्ये कंपनीने बक्कळ पैसा कमवला. यानंतर आजपर्यंत कंपनी यशाच्या शिखरावर आहे. या कंपनीने पहिल्यांदा सलग तीनवेळा रेकॉर्ड मोडला आणि तिमाही विक्री किंवा $ US100 अब्ज डॉलर्स ($ 130 अब्ज) पेक्षा जास्त नोंदवलेली आहे.

2007 मध्ये कंपनीने महत्त्वाचा टप्पा पार केला. जेव्हा त्यांनी किन्डल नावाने ई-बुक रीडर बाजारात आणलं. याच्या माध्यमातून कोणतंही पुस्तक डाऊनलोड करून तात्काळ वाचता येऊ शकतं. यामुळे कंपनीला मोठा फायदा झाला. गेल्या वर्षी ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या अहवालानुसार अॅमेझॉन फाउंडरची संपत्ती 155 अब्ज डॉलर्स होती.

मागे

हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश
हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) आणि त्यांच्या महिला सहकाऱ्याला ....

अधिक वाचा

पुढे  

CBSE 10th-12th Datesheet: वेळापत्रकासह बोर्डाकडून नवे नियम जारी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचा
CBSE 10th-12th Datesheet: वेळापत्रकासह बोर्डाकडून नवे नियम जारी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचा

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) यांनी केंद्री....

Read more