By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2020 08:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : विदेश
तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अध्यक्षीय निवडणुकीत बाजी मारणाऱ्या जो बायडन (Joe Biden )यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी सकाळी अमेरिकन जनतेला पहिल्यांदाच संबोधित केले. आपल्या पहिल्याच भाषणात बायडन यांनी ट्रम्प (Donald Trump) समर्थकांना भावनिक साद घातली. या निवडणुकीत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केले होते, त्यांची निराशा मी समजू शकतो. आता आपण एकमेकांना नवी संधी देऊयात. आता एकमेकांविषयी आरोप-प्रत्यारोप करण्याचे थांबवायला पाहिजे, वातावरणातील तणाव कमी झाला पाहिजे आणि आपण एकमेकांना नव्या नजरेतून बघायला हवे, असे आवाहन जो बायडन यांनी केले.
अमेरिकेच्या जनतेने मला विजयी केले आहे. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदासाठी इतके (74 कोटी) मतदान झाले. त्यामुळे आपला विजय हा निर्भेळ आहे. मी अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सांगू इच्छितो की, मी विभाजनाचे राजकारण करणार नाही, एकात्मतेसाठी प्रयत्न करेन. मला रेड (रिपब्लिकन) किंवा ब्ल्यू (डेमोक्रॅटस) अशी वेगवेगळी राज्य दिसत नाहीत तर मला केवळ अमेरिका दिसते, असे बायडन यांनी सांगितले.
People of this nation have spoken, they delivered us a clear victory. A victory for, we the people. We have won with the most votes ever cast on presidential ticket in the history of the nation, 74 million: US President-elect Joe Biden #USElection pic.twitter.com/h2JmcLZjoD
— ANI (@ANI) November 8, 2020
डोनाल्ड ट्रम्प निकालानंतर नाराज
मतमोजणीनंतर जो बायडन विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पुन्हा एकदा मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निरीक्षकांना मोजणीच्या रूममध्ये परवानगी नव्हती. मी निवडणूक जिंकली, मला 71,000,000 कायदेशीर मते मिळाली. आजपर्यंत कधीही न पाहिलेल्या वाईट गोष्टी आमच्या निरीक्षकांना अनुभवायला मिळाल्या. यापूर्वी कधीही झाले नाही. ज्या लोकांनी कधीही मेल बॅलेटस मागितलेच नव्हते त्यांच्याकडेही बॅलेटस पाठवण्यात आले, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
जो बायडन (Joe Biden) या निवडणुकीत 279 मते घेऊन विजयी झाले आहेत. तर ट्रम्प यांना अवघे 214 मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धूळ चारत डेमोक्रे....
अधिक वाचा