ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

जगभरात कोरोनाचा कहर, 24 तासांत 6.79 लाख नवे रुग्ण; 11 हजार लोकांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 10, 2021 09:27 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जगभरात कोरोनाचा कहर, 24 तासांत 6.79 लाख नवे रुग्ण; 11 हजार लोकांचा मृत्यू

शहर : विदेश

जगभरात वेगाने आपले पाय पसरणाऱ्या कोरोनाने आता 9 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत 9 कोटी 11 हजाराहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या चोवीस तासांत जगात कोरोना-संसर्ग झालेल्या रुग्णांची रेकॉर्ड ब्रेकिंग नोंद झाली आहे. यासह कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी चिंताजनक आहे.

दरम्यान वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जगभरात 6.79 लाखाहून अधिक लोकांना कोरोना लागण झाल्याचं समोर आलं आहे. तसेच, 11 हजाराहून अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले. आता जगभरात कोरोना संक्रमणाची संख्या 9 कोटींच्या पलीकडे गेली आहे. कोरोना विषाणूमुळे 19 लाख 33 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

तसेच, 6 कोटी 44 लाख 24 हजारांहून अधिक लोक या आजारातून बरे झाले आहेत. एकूण 9 कोटी पैकी दोन कोटी 36 लाख 53 हजार लोक अजूनही कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

17 डिसेंबरला सर्वाधिक 7.38 लाख प्रकरणे आणि 16 डिसेंबरला 13,783 लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये दिसून आला आहे. गेल्या काही दिवसात जगातील सर्वात सामर्थ्यवान अशा अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यानंतर जर्मनी, ब्राझील, रशिया, इटली, मेक्सिको, ब्रिटन आणि भारतामध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहे.

सर्वाधिक कोरोना संक्रमण असलेल्या 10 देशांची यादी

अमेरिका: एकूण रुग्ण- 22,669,416, मृत्यू- 381,136

भारत: एकूण रुग्ण- 10,451,339, मृत्यू- 151,048

ब्राझिल: एकूण रुग्ण- 8,075,998, मृत्यू- 202,657

रूस: एकूण रुग्ण- 3,379,103, मृत्यू- 61,381

यूके: एकूण रुग्ण- 3,017,409, मृत्यू- 80,868

फ्रांस: एकूण रुग्ण- 2,767,312, मृत्यू- 67,599

टर्की: एकूण रुग्ण- 2,317,118, मृत्यू- 22,631

इटली: एकूण रुग्ण- 2,257,866, मृत्यू- 78,394

स्पेन: एकूण रुग्ण- 2,050,360, मृत्यू- 51,874

जर्मनी: एकूण रुग्ण- 1,914,328 मृत्यू- 41,061

मागे

बर्ड फ्लूचा धोका वाढला, देशातील 7 राज्यांमध्ये संसर्ग झाल्याचं स्पष्ट, महाराष्ट्रात स्थिती काय?
बर्ड फ्लूचा धोका वाढला, देशातील 7 राज्यांमध्ये संसर्ग झाल्याचं स्पष्ट, महाराष्ट्रात स्थिती काय?

देशात बर्ड फ्लूचा (Bird flu) म्हणजेच एवियन इन्फ्लुएंजाचा धोका वाढला आहे. भारताती....

अधिक वाचा

पुढे  

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप केला तर कारवाई! सरकारनं दिले 'हे' आदेश, काय आहे संपाचे कारण?
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप केला तर कारवाई! सरकारनं दिले 'हे' आदेश, काय आहे संपाचे कारण?

वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम सेवेत सामावून त्‍यांना सातवा वेतन आयोग लागू क....

Read more