ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आंदोलनात लहान मुलांच्या सहभागावर बंदी घाला; झेन सदावर्तेची सुप्रीम कोर्टात याचिका

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: फेब्रुवारी 05, 2020 03:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आंदोलनात लहान मुलांच्या सहभागावर बंदी घाला;  झेन सदावर्तेची सुप्रीम कोर्टात याचिका

शहर : delhi

         नवी दिल्ली - आंदोलनामध्ये लहान मुलांना आणण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही याचिका करणारी बारा वर्षीय बालिका राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती झेन सदावर्ते आहे. दक्षिण दिल्लीतील शाहीन बागमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान चार महिन्यांच्या मोहम्मद जहांचा मृत्यू झाला होता. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) याविरोधातील आंदोलनात पालकांसोबत सहभागी झालेल्या मोहम्मदला प्राण गमवावे लागले होते.

 

        मोहम्मदच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, लहान मुलांना आंदोलनात सहभागी करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका झेनने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. मोहम्मदच्या मृत्यूचं नेमकं कारण डेथ सर्टिफिकेटमध्ये नमूद नाही, त्यामुळे पोलिस आणि संबंधित प्रशासनांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्याची विनंतीही झेनने केली आहे. मुंबईकर झेन सदावर्ते हिला प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तिने मुंबईतील रहिवाशी इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या १७ जणांना बाहेर काढलं होतं.

 
       झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायलयातील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी आहे. २२ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबईच्या हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर या इमारतीत आग लागली होती. त्यात चौघांचा मृत्यू झाला होता. तर १८ जण जखमी झाले. झेनच्या प्रसंगावधानामुळे तब्बल १७ जणांचा जीव वाचला होता. गुणरत्न सदावर्ते हे क्रिस्टल टॉवरच्या १६ व्या मजल्यावर राहत होते. अचानक लागलेल्या आगीच्या प्रसंगी लहानग्या झेनने आपल्या आईवडिलांना शांत केले. 
 
          त्यानंतर प्रसंगावधान राखत घरातील सुती कपडे ओले केले आणि ते नाकाशी धरुन शांतपणे श्वास घेण्यास सांगितले. झेन डॉन बॉस्को इंटरनॅशनल शाळेत शिकते. शाळेत आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे दिले जातात, याचाच तिने योग्य पद्धतीने वापर केला होता. आईवडिलांसह जवळपास १५ जणांना तिने बाल्कनीत बसवले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने हे सर्व बाहेर आले.

मागे

मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा
मराठा आरक्षण प्रकरणी महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा

        नवी दिल्ली - मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सर....

अधिक वाचा

पुढे  

निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना ७ दिवसांची मुदत; फाशी एकत्रच
निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना ७ दिवसांची मुदत; फाशी एकत्रच

        नवी दिल्ली - निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींना वेगवेगळी फा....

Read more