ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लॉकडाऊननंतर असा करा कोरोनापासून बचाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2020 02:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लॉकडाऊननंतर असा करा कोरोनापासून बचाव

शहर : मुंबई

देशात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढतोय. कोरोनाचं थैमान काही थांबायचं नाव घेत नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन आहे. देश लॉकडाऊन होऊन जवळपास 50हून अधिक दिवस उलटले आहेत. आता सरकारकडून काही भागात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. पण कोरोना व्हायरस पुढील आणखी काही काळासाठी असाच राहिला तर? यापासून बचावासाठी काय करणार? या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाकडून काही सल्ले, काही सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचं पालन केल्यास कोरोना आसपासही येणार नसल्याचा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला आहे.

- पुढील दोन वर्षांसाठी परदेश प्रवास रद्द करा.

- वर्षभर तरी बाहेरचं खाणं टाळा.

- अत्यावश्यक नसल्यास लग्नसमारंभ किंवा इतर पार्ट्यांमध्ये जाणं टाळा. गर्दीपासून लांब राहा.

- अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळा.

- खोकला असणाऱ्या व्यक्तीपासून योग्य ते अंतर राखा.

-  नेहमी चेहऱ्यावर मास्क लावा. उगाचच लोकांमध्ये उभं राहणं टाळा.

- चित्रपटगृह, मॉल आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पुढील 6 महिने तरी जाणं टाळा.

- रोगप्रतिकारशक्ती अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करा.

- सलूनमध्ये जाताना सतर्क राहा.

- सोशल डिस्टंन्सिंगबाबत सतत लक्षात ठेवा.

- कोरोना व्हायरस अधिक काळापर्यंत राहू शकतो. शक्य असल्यास बेल्ट, घड्याळ, अंगठी घालणं टाळा.

- हँड सॅनिटायझर, टिशू पेपर जवळ ठेवा.

- बाहेरुन आल्यानंतर इतरत्र कुठेही हात न लावता त्वरित हात-पाय स्वच्छ धुवा.

- कोरोना संशयित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा संशय असल्यास घरी येताच गरम पाण्याने अंघोळ करा.

 

मागे

कोरोनापासून वाचण्यासाठी हृदयरोगींनी अशी घ्या काळजी
कोरोनापासून वाचण्यासाठी हृदयरोगींनी अशी घ्या काळजी

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस या विषाणूने जगभरात एकच ....

अधिक वाचा

पुढे  

Immune system करा strong, आपल्यासाठी खास 10 टिप्स
Immune system करा strong, आपल्यासाठी खास 10 टिप्स

कोणत्याही आजराला लढा देण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असणे ग....

Read more