ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना व्हायरस लक्षण आणि निदान

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना व्हायरस लक्षण आणि निदान

शहर : मुंबई

'कोरोना व्हायरस' सध्या हे नाव सगळीकडे पसरत आहे. काय आहे हे कोरोना व्हायरस ...? कुठून आले हे.....?

'चीन' या देशातून हा व्हायरस आल्याचे समजत आहे. सध्या चीनच्या 'वुहान' शहरात आणि या देशात या कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे. आता हे व्हायरस फ्रान्स, अमेरिका, जपान, थायलंड, आणि इंग्लंडसह अजून बऱ्याच देशात पसरत चालला आहे. या व्हायरसाची लागवण खूप प्राणघातक आहे. ह्याचे विषाणू झपाट्याने वाढतात. हा एक नवीन व्हायरस असून सार्स severe acute respiratory syndrome (SARS) नावाच्या कोरोनाचे विषाणू पेक्षा हे विषाणू जास्त घातक आहे.

2002 -2003 साली सार्स नावाच्या विषाणूंमुळे 8,098 लोक संक्रमित झाले होते. ह्यात 774 लोकं मरण पावले. डिसेंबर 2019 च्या पहिल्या आठवड्यात नवीन कोरोना व्हायरस सापडला. त्याला कोरोनाचा नवा विषाणूंचा प्रकार घोषित केला गेला. या पूर्वी 6 अजून कोरोना व्हायरसची निश्चिती झाली असून सध्याच्या व्हायरसाचा हा 7 वा प्रकार आहे.

चिकित्सा परामर्श दात्यानुसार सगळेच कोरोना व्हायरस जीवघेणे आणि धोकादायक नसतात. पण तरी ही त्यांचे प्रकार गंभीर आहेत. हे व्हायरस सर्दीच्या विषाणूंसारखेच पसरतात. हे मानव आणि प्राणी दोघांना संक्रमित करतात. हे लवकर प्रसरण पावतात. लहान मुलांमध्ये या विषाणूंचे संसर्ग लवकर होते. ह्या व्हायरसच्या संसर्गामुळे श्वास घ्यायला त्रास होते. नाक वाहणे, खोकला होणे आणि घसा खवखवणे, आणि ताप येणे असे त्रास संभवतात. लहान मुलांच्या कानात संक्रमण होऊ शकते. फुफ्फुसात पसरल्यावर न्यूमोनिया होऊ शकतो. जास्त करून शारीरिक दुर्बळ असणारे, वृद्ध, हृदयरोगी, कमकुवत प्रतिकारक शक्ती असणारे ह्यांना या विषाणूची लागवण लवकर लागते.

कोरोना व्हायरस अनेक विषाणूंचा जाळ आहे. याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात. कोरून हे नांव त्यांचा क्राऊन सारख्या दिसणाऱ्या आकारांवरून पडले आहे. हे विषाणू सर्दी पडसेच्या विषाणूंसारखेच पसरतात. ह्यात शिंक येणे, खोकला येणे या सारखे लक्षण दिसतात. या व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून आले आहे. चीन देशात मिळणाऱ्या सी फूड मधून हे विषाणू पसरले आहे. हे विषाणू अजून जीवित प्राणी जसे वटवाघूळ, डुक्कर, पाळीव प्राणी जसे-चिमणी, मांजर, कुत्रे, उंट आणि मर्मोट्स यांचा मुळे पसरत आहे.

हे सर्दी, पडसे, खोकला सारखे एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्ती पर्यंत पसरतात. शिंकल्या वर खोकल्यावर उडणारे विषाणू एकमेका पर्यंत जाऊन ह्याची लागवण होते. संक्रमित व्यक्तीच्या हाताला स्पर्श केल्याने त्याचा जवळ गेल्याने या विषाणूंची लगेच लागवण होते. कोरोना विषाणूची लागण झालेली एक व्यक्ती बर्‍याच लोकांना संक्रमित करू शकते. हा कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार असल्याने त्याच्या प्रसाराचे नेमके कारण कळण्यात आले नाही.

ह्या विषाणूंच्या लागवण असल्याची काही लक्षणे जाणून घेऊ या....

घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप असणे हे त्याची प्राथमिक लक्षणे मानली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाची मुख्य लक्षणे आहेत.

डोकेदुखीः दिवसभर डोकं जड होणे, सतत डोकेदुखी होणे.

वाहणारे नाक: सतत बरेच दिवस वाहणारे नाक आणि औषधोपचारानंतर पण नियंत्रित होत नसणे.

खोकला असणे: जास्त खोकला हे कोरोना व्हायरस संक्रमणाचे लक्षण असू शकते.

घसा खवखवणे: या संसर्गामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा घसा नेहमी खवखवतो.

ताप येणे: कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ताप येणे हे या संसर्गाचे प्रारंभिक लक्षण आहे.

अस्वस्थता: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शरीरात अस्वस्थता जाणवते. त्याला काय होता आहे हे स्वतःला कळत नाही. आजारी असल्याचे आढळून येते.

शिंका येणे: कोरोना विषाणूचा श्वसन प्रणालीवर परिणाम होतो ज्यामुळे शिंका येणे हे या त्रासाची लक्षणे आहे.

दम्याचा त्रास वाढणे: दम्याच्या रूग्णांना या संसर्गामुळे श्वास घेण्यास सर्वात जास्त त्रास होतो.

थकवा येणे: दिवसभर थकवा जाणवणे आणि शरीरात सतत थकवा येणे हे कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे लक्षण आहे.

कोरोना व्हायरसचे संसर्ग बर्‍याच देशात वेगाने पसरत आहे आणि ज्यांना ह्या विषाणूंची लागवण झाली आहे ते मरण पावत आहे. सध्या तरी या विषाणूंसाठी कोणतेही औषध किंवा लस नसल्याने हे अत्यंत धोकादायक मानले जात आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला असून 2744 लोक संक्रमित आहेत. यामुळेच अजून 5794 लोकांना संसर्ग होण्याची भीती आहे. याचे लक्षणे सर्दी सारखी दिसणारी असल्यास तरी हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. ह्या व्हायरसाची लस देशात जरी नसली तरी आपण आपल्यापरीने ह्याची काळजी घेऊ शकतो आणि काही उपाय करू शकतो.

 

उपाय

आपले हात दिवसातून अनेक वेळा साबण, कोमट पाणी आणि अल्कोहलयुक्त हॅन्ड सेनेटायझरने स्वच्छ करावे.

तोंडाला मास्क लावावे. चांगल्या मास्कचा वापर करावा. घरातून निघण्यापूर्वी मास्क लावूनच निघावे.

आपल्या बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करू नये.

प्राण्यांपासून लांब राहणे, मीटचे सेवन करणे टाळावे.

गरज असल्यास घरातून बाहेर जाणे.

संक्रमित व्यक्ती पासून लांब राहणे.

बाहेरचे खाद्यपदार्थ घेणे टाळावे.

शिंकताना, खोकताना तोंडावर रुमालाचा वापर करणे.

सर्दी खोकल्याने संक्रमित व्यक्तींच्या जवळ न जाणे.

सडके आणि शेतात प्राण्याच्या संपर्कात न जाणे.

भरपूर विश्रांती घेणे.

भरपूर पेय घेणे.

तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घेणे.

लहान मुलांना एस्परिन देणे टाळावे.

त्वरित डाँक्टरला दाखवणे. मनाने कोणतेही औषधोपचार घेणे टाळावे. औषधे चिकित्सकांच्या परामर्शानुसारच घ्यावे.

 

मागे

मेंदूचा कर्करोग आणि उपचार
मेंदूचा कर्करोग आणि उपचार

कॅन्सर एक असा असाध्य आजार ज्याचे नाव एकूणच अंगाची थरकाप होते. पण विचार करून ....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना व्हायरसबद्दल 10 खोट्या गोष्टी, ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे
कोरोना व्हायरसबद्दल 10 खोट्या गोष्टी, ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे

जगभरात 100 हून अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरस पाय पसरून चुकला आहे. भारतात देख....

Read more