ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Diabetes : या 3 गोष्टी लक्षात घ्या, मधुमेहावर नियंत्रण ठेवा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 05, 2020 12:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Diabetes : या 3 गोष्टी लक्षात घ्या, मधुमेहावर नियंत्रण ठेवा

शहर : मुंबई

आजच्या काळात कुठलेही आजार वयोगट बघत नाही त्या मधून मधुमेह असा आजार आहे जो वडिलांपासून ते मुलांपर्यंत होतो. मधुमेह असल्यास त्याला नियंत्रित करणे महत्वाचे असते. नाहीतर यामुळे इतर आजार होण्याचा धोका संभवतो. मधुमेहाला नियंत्रित करण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला तर घ्याच पण स्वतःहून या गोष्टींचे पालन करा. मधुमेहाला नियंत्रित करा.

1 तांब्याचा भांड्यात पाणी प्या

तांब्याचा भांड्यात ठेवलेले पाणी पिणे सर्व आजारांसाठी फायदेशीर असते. यासाठी दररोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे, सकाळी दररोज उठल्यावर ते प्यावे. तांब्याचा भांड्यात कॉपरअँटी ऑक्सीडेन्ट आणि अँटी इंफ्लेमेटरीचे गुणधर्म असतात. जे मधुमेहास नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

2 मेथीदाणे खाणे

बऱ्याच संशोधनानंतर हे सिद्ध झाले की मेथीदाण्यांचे सेवन मधुमेहामध्ये खूप फायदेशीर आहे. यासाठी आपण दररोज 10 ग्रॅम मेथीदाणे गरम पाण्यात भिजवून ठेवावे आणि त्याचे सेवन दररोज करावे. असे केल्यास टाइप-2 मधुमेहास नियंत्रित करण्यास मदत होते.

3 मिठाई पासून दूर राहावे

मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ मिठाईपासून दूर राहणे पुरेसे नाही तर इतर खाद्यपदार्थात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारलं, कोरफड, आवळा या सारख्या गोष्टींचे सेवन मधुमेहामध्ये फायदेशीर आहे.

मागे

शेवगाच्या शेंगा एक अमृत...
शेवगाच्या शेंगा एक अमृत...

शेवगाच्या शेंगांचे आपल्या आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शेवगाच्या शेगत 300 हून....

अधिक वाचा

पुढे  

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या...
रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या...

आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येत....

Read more