ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

औषधांच्या विक्रीत ड्रग्ज आणि गर्भपाताच्या गोळ्या नंबर एक वर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 28, 2019 07:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

औषधांच्या विक्रीत ड्रग्ज आणि गर्भपाताच्या गोळ्या नंबर एक वर

शहर : पुणे

       पुणे - हल्ली सारं काही ऑनलाईन मिळत असताना औषधांची ऑनलाईन विक्रीदेखील तेजीत आहे. मात्र या पुढच्या काळात औषधांची ऑनलाईन खरेदी -विक्री थांबवावी लागणार आहे. दिल्ली उच्च नयायलायाच्या आदेशानंतर पुण्यामध्ये ऑनलाईन औषध विक्रेत्यांवर कारवाई सुरु करण्यात आलीय.

 

      धक्कादायक म्हणजे, ऑनलाईन औषध विक्रीमध्ये नशेच्या गोळ्या तसंच गर्भपाताच्या किट्सना अधिक मागणी आहे. हा प्रकार केवळ अनधिकृत नसून असुरक्षितही आहे. आता ऑनलाईन औषध विक्री बंद झाल्यानंतर या मागणीचा पुरवठ्यासाठी इतर अनधिकृत मार्गांचा वापर होण्याचीही शक्यता आहे. 


       नुकतीच पुण्यातील 'प्लॅनेट फार्मा' या औषध विक्रेत्याला नोटीस बजावण्यात आलीय. औषधांची ऑनलाईन विक्री करत असल्या कारणानं अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली. दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या एका निकालानंतर उचलण्यात आलेलं हे पहिलं पाऊल असल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त एस बी पाटील यांनी दिलीय.


       सध्या इंटरनेटवर ऑनलाईन औषध विक्रीचा अक्षरशः बाजार झालाय. ग्राहकांचाही त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र ऑनलाईन औषध विक्रीला कायदेशीर मान्यता नाही. ग्राहकाला बनावट तसंच कमी गुणवत्तेची औषधं विकली गेल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर औषधांच्या ऑनलाईन विक्रीला अन्न आणि औषध प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलीय. 


        औषधांची ऑनलाईन विक्री बंद करावी अशी औषध दुकानदारांची फार पूर्वीपासूनची मागणी होती, असं केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे खजिनदार रोहित करपे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनीही या कारवाईचं स्वागत केलंय.एफडीएनं हाती घेतलेली ही कारवाई कितपत प्रभावी ठरते, हे लवकरच स्पष्ट होईल.
 

मागे

विषाणू ओळखणारे सुलभ उपकरण विकसित
विषाणू ओळखणारे सुलभ उपकरण विकसित

           माणसाला अनेक रोग हे विषाणूंमुळे होत असतात. हे विषाणू पकडून त....

अधिक वाचा

पुढे  

४४० जणांना कोरोना विषाणू संसर्ग; ९ बळी
४४० जणांना कोरोना विषाणू संसर्ग; ९ बळी

       बीजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूने आतापर्यंत मरण पावलेल्यांची सं....

Read more