ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गायत्री मंत्र जपाने दूर होतो मानसिक तणाव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 01:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गायत्री मंत्र जपाने दूर होतो मानसिक तणाव

शहर : मुंबई

एकाग्रता वाढवणे आणि मानसिक तणावापासून दूर राहण्याचा सर्वात चांगला आणि यशस्वी मार्ग मंत्र जप करणे आहे. शास्त्रामध्ये सर्व देवी-देवतांचे वेगवेगळे मंत्र सांगण्यात आले आहेत. या मंत्रांमध्ये गायत्री मंत्राचे विशेष स्थान आहे. गायत्री देवीला प्रसन्न करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप केला जातो. जो व्यक्ती या मंत्राचा नियमितपणे जप करतो त्याचे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते. येथे जाणून घ्या, गायत्री मंत्राशी संबंधित काही खास गोष्टी...

गायत्री मंत्र -: ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो : प्रचोदयात्।

अर्थ -: त्या प्राणस्वरूप, दु: नाशक, सुख स्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देव स्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरआत्म्यात धारण करू. त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे.

केव्हा-केव्हा करू शकता या मंत्राचा जप

> शास्त्रानुसार गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. या मंत्राचा जप करण्यासाठी तीन वेळा सांगण्यात आल्या आहेत. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी पहिली वेळ प्रातःकाळ, सूर्योदयापूर्वी मंत्र जप सुरु करावा. जप सूर्योदयापर्यंत करावा.

> मंत्र जपासाठी दुसरी वेळ मध्यान्ह म्हणजे दुपारची आहे. दुपारच्या वेळीसुद्धा या मंत्राचा जप केला जाऊ शकतो. यानंतर तिसरी वेळ म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गायत्री मंत्राचा जप सुरु करावा.

> या तीन वेळेव्यतिरिक्त गायत्री मंत्राचा जप करावयाचा असेल तर मौन बाळगून मानसिक स्वरुपात जप करावा. या मंत्राचा जप मोठ्या आवजात करू नये.

मंत्र जपाने होणारे लाभ

>  11 लाभ याप्रकारे आहेत -: उत्साह आणि सकारात्मकता प्राप्त होते, त्वचा उजळ होते, त्वचेमध्ये चमक येते, तामसिकता दूर होते. परमार्थ कार्यामध्ये रुची जागृत होते. पूर्वभास होऊ लागतात. आशीर्वाद देण्याची शक्ती वाढते. डोळ्यांमध्ये आकर्षण येते. स्वप्न सिद्धी प्राप्त होते, क्रोध शांत होतो, ज्ञानामध्ये वृद्धी होते.

मागे

या उपायांमुळे दूर होऊ शकतात दातांचे आजार
या उपायांमुळे दूर होऊ शकतात दातांचे आजार

आईस्क्रीम खाताना दात ठणकतो आणि हात गालाकडे जातो. हे अनेकांनी अनुभवले असेल. त....

अधिक वाचा

पुढे  

खाण्याचे हे नियम तुम्हाला ठेवतील निरोगी
खाण्याचे हे नियम तुम्हाला ठेवतील निरोगी

खाण्याशी संबंधित काही नियम घालून घेतल्यास आपले आरोग्य टिकवून ठेवणे सोपे जा....

Read more