ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

हिवाळ्यात अशाप्रकारे घ्या आरोग्याची काळजी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हिवाळ्यात अशाप्रकारे घ्या आरोग्याची काळजी

शहर : मुंबई

असे करा नियोजन

रोज रात्री झोपताना एक ग्लास भरून दूध प्यावे आणि त्यात एक चमचा तूप टाकावे म्हणजे झोपही चांगली लागते आणि तुपाच्या रूपाने पोटात चरबी साठते. अशाच पद्धतीने आयुर्वेदामध्ये निरनिराळ्या पद्धतीने तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा तूप, एक चमचा पिठी साखर आणि थोडेसे मिरे मिसळून खावेत असेही आयुर्वेद सांगतो. हिवाळ्यात प्रथम ओठांवर आणि त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचा कोरडी पडणे, काळी पडणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. मॉइश्चराइझ करणे, योग्य आहाराचे सेवन करणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते.

थंडीत करा हे उपाय

मुलायम ओठांसाठी -: फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम जेली लावण्यापेक्षा व्हिटॅमिन ''ने युक्त असलेल्या 'लिप केअर' उत्पादनांचा वापर करावा. याच्या वापराने त्वचेतील ओलावा कायम राहण्याबरोबरच सूर्याच्या दाहकतेपासून त्वचेचा बचाव होण्याबरोबरच चेहऱ्यावरील डार्क स्पॉट कमी होण्यासदेखील मदत होते.

त्वचेसाठी -: थंडीत रुक्ष पडणाऱ्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी 'कोको बटर क्रीम'चा वापर करणे उत्तम राहील. या क्रीमच्या वापराने केवळ शरीराला सुगंधच प्राप्त होतो असे नाही, तर नियमित वापराने क्रीम खोलवर जाऊन त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते.

अंघोळीपूर्वी -: ऑलिव्ह ऑइलने शरीराला हलक्या हाताने मसाज करणे. यामुळे शरीरातील मॉश्चर कायम राहण्यास मदत होऊन त्वचा मऊ राहते. चेहऱ्यासाठी त्वचेतील ओलावा कायम ठेवणाऱ्या क्रीमची निवड करा.

पायांच्या भेगांवरील उपाय -: पायांच्या भेगांना थंडीत शरीरातील ओलावा कमी होत असल्याने प्रामुख्याने त्वचेवर याचा विपरित परिणाम होतो. थंड हवामानाचा सर्वाधिक प्रभाव जाणवतो तो टाचांवर. पायांवरील भेगामुंळे काहींना तर चालणेदेखील कठीण होते. रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरीन आणि गुलाब पाण्याने रोज हलका मसाज घेतल्यास आश्चर्यकारक फरक जाणवेल.

मागे

रक्तवाढीसह पित्तनाशक आहे, वातदोषही कमी करते सीताफळ
रक्तवाढीसह पित्तनाशक आहे, वातदोषही कमी करते सीताफळ

सीताफळ एक सीझनल फळ आहे. सध्या बाजारात सीताफळे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे....

अधिक वाचा

पुढे  

पित्ताच्या त्रासावर या उपायांनी मिळेल आराम
पित्ताच्या त्रासावर या उपायांनी मिळेल आराम

चुकीची जीवनशैली, सततची धावपळ, वेळी-अवेळी खाणे, फास्ट फूड, जागरण, मानसिक ताणतण....

Read more