ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मार्च 27, 2019 10:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी

शहर : मुंबई

घराबाहेर पडताना शक्यतो उपाशीपोटी घराबाहेर पडू नका. कारणा उन्हामुळे त्रास होण्याची शक्यता असते. घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सतत जवळ ठेवा. कारण उन्हामुळे शरीरातील पाण्याची मात्र कमी होते. त्यामुळे सतत पाणी पित रहा.  उन्हात बाहेर गरम हवा वहात असते. त्यापासून शरीराचं रक्षण करण्यासाठी चेहरा सुती कपड्याने झाका.  घराबाहेर उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी घेऊ नका. कारण त्याचा शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. घराबाहेर गेल्यानंतर उघड्यावर विके जाणारे पदार्थ खाऊ नका.  एसीतून थेट उन्हात जाऊ नका किंवा एसीतून बाहेर पडल्यानंतर थोडा वेळ सामान्य वातावरणात काही वेळ घालवत्यानंतर घराबाहेरी पडा. उन्हाळ्यात शक्यतो सुती कपड्यांचा वापर करा.

त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. बाहेर जातांना गॉगल, टोपी आणि रुमाल वापरा. कारण त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळांपासून डोळ्यांचे संरक्षण होते. उन्हाळ्यात भरपेट जेवण करू नका. भूकेपेक्षा थोडं कमी जेवण करा. उन्हाळ्यात तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाऊ नका.  त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. उन्हाळ्यात शक्यतो शिळे अन्न खाऊ नका, घरातील उरलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवा. दररोज आहारात दही आणि ताकाचा समावेश असावा तसेच लिंबू पाणी आणि नारळ पाणी घ्या. ते उन्हाळ्यात शरिरासाठी फायदेशीर आहे. टरबूज, खरबूज, आणिा काकडी ही उन्हाळ्यात मिळणारी फळे घ्या ही काळजी घेतल्यात त्याचा फायदा होईल.

पुढे  

भर उन्हात वातावरणात गारवा, नागरिकांना करण्यात आले तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन
भर उन्हात वातावरणात गारवा, नागरिकांना करण्यात आले तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन

मार्च महिना संपत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वेळीही उन्हाच्य....

Read more