ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एलआयसीत 8 हजार पदांसाठी भरती

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2019 01:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एलआयसीत 8 हजार पदांसाठी भरती

शहर : मुंबई

भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून 'असिस्टंट क्लार्क' या पदासाठी मेगा भरती सुरू आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमधील तब्बल 8 हजार जागा भरण्यात येत आहेत.

एलआयसीकडून 24 वर्षांनंतर ही पदभरती करण्यात येत आहे. त्यानुसार असिस्टंट क्लार्क पदासाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाईल. यासाठी उमेदवार पदवीधर असणे बंधनकारक असून त्यांचे वय 18 ते 30 दरम्यान असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. पूर्व परीक्षेसाठी आकलन क्षमता, न्यूमेरिकल अबिलिटी आणि इंग्रजी हे विषय असून ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे असे परीक्षेचे स्वरूप असेल. या परीक्षेसाठी संपूर्ण देशात परीक्षा केंद्रे असून महाराष्ट्र मध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर औरंगाबाद कोल्हापूर, नाशिक रत्नागिरी सातारा, सोलापूर पणजी आदि ठिकाणी परीक्षा होणार आहे. इच्छुकांनी 1 ओक्टोंबरपर्यंत www.licindia.in/careers या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल.

 

 

 

 

पुढे  

आता तुम्हाला तुमचा पीएफ इच्छेनुसार वजा करता येणार...
आता तुम्हाला तुमचा पीएफ इच्छेनुसार वजा करता येणार...

नोकरदार लोकांना आता भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ इच्छेनुसार वजा करता य....

Read more